स्थानिक उत्पादकांकडून खरेदी करा, सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळा- मनपा प्रशासक जी.श्रीकांत
या दिवाळीत स्थानिक उत्पादक यांचे कडूनच वस्तू खरेदी करण्याचा संकल्प करा...
सिंगल युज प्लॅस्टिक चा वापर टाळून पर्यावरण वाढीस हातभार लावूया
प्रशासक यांचे नागरिकांना आवाहन...
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) या दिवाळी पासून ते पुढील दिवाळी पर्यंत आपण जर काही खरेदी कराल ते स्थानिक उत्पादक यांच्या कडूनच खरेदी करावे तसेच सिंगल युज प्लॅस्टिक चा वापर टाळून पर्यावरण वाढीस हातभार लावण्यासाठी सर्वांनी पुढे यावे तसेच आपल्याला नको असलेल्या वस्तू गरजू लोकांना द्या असे आवाहन आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या RRR सेंटर चे उद्घाटन प्रसंगी केले.
महानगरपालिकेच्या वतीने माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविण्यात येतो. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने महानगरपालिका मुख्यालय कला दालन येथे RRR सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. महानगरपालिकेच्या वतीने सर्व झोन कार्यालय मिळून कला दालन येथे माणुसकीची भिंत उपक्रमाअंतर्गत RRR सेंटर सुरू करण्यात आले असून या ठिकाणी जे नको असेल ते जमा करा व जे हवे असेल ते घेऊन जा. या संकल्पना नुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपल्याला जे नको असलेल्या वस्तू गरजू लोकांपर्यत पोहचावी हा मुख्य उद्देश या मागे आहे.
या नको असलेल्या वस्तू इतरत्र कोठेही न टाकता मनपाच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून RRR सेंटर मध्येच द्यावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
RRR सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उप आयुक्त मंगेश देवरे, उप आयुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव ,सहायक आयुक्त संजय सुरडकर, रमेश मोरे, नईम अन्सारी, भारत बिऱ्हारे, अर्जुन गिराम, शेख समी उद्दिन ,स्वच्छता निरीक्षक, जवान ,कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी पर्यावरण पूरक वस्तू स्थानिक उत्पादक यांचे कडूनच खरेदी करू, सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरण वाढीस हातभार लावू तसेच आपल्या कडील नको असलेल्या वस्तू गरजू लोकां पर्यंत पोहचविण्यासाठी RRR सेंटर मध्येच देऊ असा संकल्प वजा शपथ घेण्यात आली. सदर RRR सेंटर मध्ये सद्य स्थितीत कपडे, पादत्राणे, खेळणी,भांडे उपलब्ध आहेत. आज उद्घाटन प्रसंगी लहान गरजू मुलांना प्रशासक यांच्या हस्ते खेळणी वाटप करण्यात आली.
सदर RRR सेंटर आज दि.9 नोव्हेंबर पासून दि.16 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे असे मनपा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
What's Your Reaction?