जातीयवादी भाजपा-एमआयएमला मतदान करु नका - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
जातीयवादी भाजप आणि एमआयएमला मतदान करु नका; काँग्रेसचा महापौर बनवा, नगरसेवक बिनविरोध निवडून येणे लोकशाहीसाठी घातक – बाळासाहेब थोरात
मुफ्ती हारुन नदवी यांचा असदुद्दीन ओवेसींवर जोरदार हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 12 (डी-24 न्यूज):
भाजप आणि एमआयएम हे जातीयवादी राजकीय पक्ष असून समाजात फूट पाडून राजकीय स्वार्थ साधतात. केवळ घोषणाबाजीने विकास होत नाही, तर काँग्रेस प्रेम, जात सलोखा आणि विकासावर बोलते असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात कटकट गेट येथे जाहीर सभेत केले.
कटकट गेट येथे आयोजित भरगच्च
जाहीर सभेत ते बोलत होते. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून महानगरपालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता असूनही शहर आजही पाण्यासाठी त्रस्त आहे. एमआयएमचे नगरसेवक निवडून आले त्यांनी वार्डाचा विकास केला का...? काँग्रेसच्या कार्यकाळातच पैठणहून पाणी शहरात आणण्यात आले आणि अनेक विकासकामे मार्गी लागली. काँग्रेस जे वचन देते ते पूर्ण करते. शहराच्या विकासासाठी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन महापौर बनवा, मग विकासाचा वेग कसा वाढतो ते पाहा, असे आवाहन त्यांनी केले.
या सभेला हजारोंची उपस्थिती लाभली असून संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मुफ्ती हारुन नदवी यांनी एमआयएमचे सुप्रोमो बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागली. शहरात इंग्रजी शाळा बांधण्याची घोषणा करण्यात आली होती; उद्घाटन छोटे ओवीसींनी केले मात्र आजपर्यंत शाळा सुरू झाली का...? पाण्याचा प्रश्न सुटला का....? बेरोजगारी कमी झाली का...? हे समाजाची दिशाभूल करत भाजपाला निवडणुकीत फायदा पोहचवत आहे अशी टिका त्यांनी केली. एमआयएम एकतेचा दावा करत असली तरी ती प्रत्यक्षात समाजात फूट पाडणारी पार्टी असून जिथे जाते तिथे वाद निर्माण होतात, असा आरोपही त्यांनी केला. महापालिका निवडणुकीत कोठे कोठे वाद झाले तुमच्या समोर आहे. यांच्या भुलथापांना बळी पडू नका. मुस्लिम धर्मगुरु बद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना मते देऊ नका, अजित पवार भाजपासोबत सत्तेत आहेत कोणत्या तोंडाने मते मागत आहे. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापणा-या बाबा रामगिरींवर कार्यवाही केली का...? वक्फ संशोधन बिलाचा विरोध केला होता का हा प्रश्न त्यांना विचारा असे वक्तव्य जाहीर सभेत त्यांनी मतदारांना केले. इम्तियाज जलिल खासदार-आमदार बनले होते स्वतःसाठी आलिशान मन्नत बंगला बांधला; मात्र गरिबांना घरकुल मिळाले का, असा सवालही त्यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, कमाल फारुकी, इब्राहीम पठाण, डॉ. सरताज खान, डॉ. जितेंद्र देहाडे, प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवार इब्राहीम पटेल, डॉ.पवन डोंगरे, जमील खान, साहीर खान, अॅड. सैय्यद अक्रम, रविंद्र काळे, आमेर अब्दुल सलीम, शहेजाद ऊर्फ दग्गू पटेल, मुनव्वर खान, अॅड. अल्फिया जमील खान, डॉ. फिरदौस फातेमा रमजानी खान, अशफाक जमील खान आदी मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?