पँथर्स रिपब्लिकन पक्षाने केले मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात आंदोलन
पँथर्स रिपब्लिकन पार्टीने केले धरणे आंदोलन
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) राज्यात मागासवर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणात गांव खेड्यांमध्ये अन्याय अत्याचार वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने वारंवार मागासवर्गीय समाजावर जातीयवादी मानसिकतेच्या गावगुंडांना कायदा व प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही सातत्याने मागासवर्गीयांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना सुद्धा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र बघायची भुमिका घेताना दिसून येत आहे. कोणतेही वक्तव्य कोणतीही कारवाई गृहमंत्री करताना दिसून येत नाही तरी अशा जातीयवादी मानसिकतेतून हल्लेखोरांना पाठीशी घालत आहे की काय असा गंभीर प्रश्न मागासवर्गीय समाजासमोर निर्माण झाला आहे तरी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मराठवाडा अध्यक्ष सर्जेराव मनोरे, मराठवाडा सरचिटणीस साहेबराव नवतूरे, जिल्हाध्यक्ष विजय दिवेकर, महेंद्र वाघमारे, सोमेनाथ महापूरे, रंजित साळवे, अनिल मोरे, प्रविण गाडेकर, संदीप काळे, राकेश साबळे, सचिन वाघमारे, नारायण हिवाळे, अमोल नरवडे, प्रकाश म्हस्के, किरण डोळस, सचिन मोरे, बाळू पवार, अविनाश साठे, शुभम मोकळे, संजय बनसोडे, नितीन गायकवाड, अमोल कसाब, दिपक मिसाळ, प्रदीप गायकवाड, लताबाई थोरात, सावित्रीबाई साळवे, संगीताबाई सोनवणे, शशिकला तीनगोटे, दैवशाली जिने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?