हिंदू-मुस्लिमांनी दिला एकतेचा संदेश, दौलताबाद येथे उद्या विसर्जन
हिंदू-मुस्लिमांनी दिला एकतेचा संदेश, दौलताबाद येथे उद्या विसर्जन
खुलताबाद,दि.28(डि-24 न्यूज) यावेळी गणपती विसर्जन व ईद मिलादुन्नबी एकाच दिवशी आल्याने हिंदू मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश दिला आहे. आज ईद मिलादुन्नबी निमित्ताने लाखो भाविक दौलताबाद मार्गे खुलताबाद येथे प्रेषित मोहंमद पैगंबर (स.अ.व.स.) यांचे पैरन मुबारक(पोषाख व मिशिचे केस) चे दर्शन घेण्यासाठी व जरजरी बक्ष दर्गाहच्या उर्सनिमित्ताने लोखो भाविक येतात. दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढलेला असतो यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही हिंदु समाजाने समजूतीने आज गणेश विसर्जनाची मिरवणूक न काढता उद्या मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. दौलताबाद परिसरातील सहा गणेश मंडळांनी पोलिसांच्या बैठकीत या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. यामुळे एकता अखंडतेचा संदेश समाजात गेला आहे. औरंगाबाद शहरातील किराडपूरा येथे काही वर्ष अगोदर घडलेल्या दंगलीमुळे धब्बा लागला होता तो आता पुसला गेला आहे.
औरंगाबाद शहरात शहागंज, हजरत नाजिमोद्दीन दर्गाह येथून दरवर्षी ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने जूलूस ए मोहंमदी काढले जाते परंतु आज गणेश विसर्जन असल्याने दोन दिवसानंतर 30 सप्टेंबर रोजी हा जूलूस शहरात सकाळी 8.30 वाजता काढण्यात येणार आहे अशी माहिती निमंत्रक डॉ.शेख मुर्तुझा यांनी डि-24 न्यूजला कळवले आहे.
आज खुलताबाद येथे लाखो भाविक यांनी पैरन मुबारकचे दर्शन घेतले. उर्सनिमित्ताने मोठ्या प्रमाणात येथे ख्वाजा व विविध खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहे. वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दर्गाह कमेटी व प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था उर्सनिमित्ताने केली आहे. आज अल्पसंख्याक व पननमंत्री अब्दुल सत्तार, गंगापूर - खुलताबादचे आमदार प्रशांत बंब, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तहसीलदार स्वरुप कंकाळ, डीवायएसपी राज ठाकूरवाड, हजरत जरजरीबक्ष दर्गाह कमेटीचे अध्यक्ष एजाज अहमद, शरफोद्दीन, माजी नगराध्यक्ष एड कैसरोद्दीन, मुजीबुर्रहेमान, मतिन जागिरदार, मो. नईम, इम्रान जागिरदार , फजिकत अहेमद उपस्थित होते.
What's Your Reaction?