छावणी गणेश महासंघाच्या वतीने कुस्त्यांची दंगल उत्साहात

 0
छावणी गणेश महासंघाच्या वतीने कुस्त्यांची दंगल उत्साहात

छावणी गणेश महासंघातर्फे भव्य कुस्त्यांची दंगल उत्साहात संपन्न

 

औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) छावणी गणेश महासंघातर्फे दर सालाप्रमाणे या वर्षालाही भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेमध्ये शहरातील तसेच तालुका स्तरातील अनेक तालमीचे मल्ल कुस्तीसाठी आले होते. यामध्ये हरसुल ,जटवाडा, सावंगी, पडेगाव, तिसगाव, दौलताबाद, खुलताबाद, पैठण, नायगाव, जालना, वाळूज, छावणी, येथील लहान तरुण मुलांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. या कुस्त्या छावणी येथील बास्केटबॉल च्या मैदानावरती लाल मातीमध्ये या कुस्त्या घेण्यात आल्या. या कुस्त्यांचे प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, शहर गणेश महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ, युवा नेते हर्षवर्धन कराड ,माजी खासदार उत्तमसिंग पवार ,यांच्यासह छावणी गणेश महासंघाचे युवराज डोंगरे, प्रमुख मार्गदर्शक अशोक सायना यादव, कार्याध्यक्ष रखमाजी जाधव, श्री संजय गारोल, श्री करण सिंग काकस, अश्फाक खान, श्री राहुल एलदी, नंदू मस्के, महादेव जाधव, श्री बॉबी डिंगरा, ॲङ, सुरेश वर्मा, रमेश लिंगायत ,नितीन यादव ,अनिकेत वर्के, दीपक क्षीरसागर, निलेश धारकर, कुमार गांजले निलेश गंजरा, दिगंबर पोळ, शेख वजीर ,एम ए अझर, सागर डोंगरे ,अभिषेक डोंगरे, नंदू एलदी, दादारावजी शेजवळ,प्रा.शिवाजी गायकवाड तसेच व या कुस्ती स्पर्धेसाठी पदक विजेते नामवंत पंच ,उपस्थित होते या कुस्त्या पाच वर्षापासून ते तरुणापर्यंत घेण्यात आल्या. यामध्ये लहान मुलांना प्रत्येकी 20/ 20 रुपयापासून ते तरुणांना पाच हजार रुपये कुस्तीचे पारितोषिक रोख देण्यात आले. या स्पर्धेमध्ये शेवटची अंतिम लढत ही 13000 रुपयाची रोख घेण्यात आली. यामध्ये जालन्याच्या मल्लाने ही कुस्ती चितपटाद्वारे जिंकली 

या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण म्हणजे दोन लहान मुलींनी सुद्धा सहभाग नोंदवला होता आणि या मुलींनी मुलांसोबत कुस्ती खेळून एका प्रकारे दंगल चित्रपटाची आठवण करून दिली यास कुस्ती स्पर्धेमध्ये या मुली जेव्हा कुस्ती खेळत असताना प्रेक्षकांनीही त्यांना रोग पारितोषिक देऊन व टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवला.

 या कुस्ती स्पर्धेसाठी छावणी गणेश महासंघाचे प्रमुख मार्गदर्शक अशोक सरांना यादव यांनी आमदार शिरसाठ यांच्याकडे मागणी केली की छावणी मधील एकमेव नामवंत तालीम ही गवळीपुरा येथे होती या तालमीच्या माध्यमातून अनेक मल्ल तयार झाले जे पुढे जाऊन लष्कर व पोलिसांमध्ये या खेळाच्या बळावरती भरती झाले परंतु काही वर्षापासून ही तालीम नामशेष झाली असून बंद झाली आहे. तेव्हा या तालमीला पूर्वीसारखी पूर्ववत करण्यासाठी आपल्या माध्यमातून निधीची तरतूद करून ही तालीम चालू करावी यावेळेस शिरसाठ यांनी यासाठी मी नक्की पूर्ण ते प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. यावेळेस भाजपचे युवा कार्यकर्ते हर्षवर्धन कराड यांनीही या तालीमेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ही स्पर्धा पाऊस सुरू असला तरी मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाली या कुस्त्या पाण्यासाठी छावणीसह इतर पंचक्रोशीतील सर्व जाती-धर्माचे नागरिक उपस्थित होते या कुस्तीदरम्यान आपापले उस्ताद आपापल्या शिष्यांना डावपेच्याचे मार्गदर्शन करत असल्याचेही दिसून आले. या स्पर्धा अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. या कुस्ती स्पर्धेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उस्तादांचे फेटे बांधून स्वागतही गणेश महासंघातर्फे करण्यात आले. हलगीच्या तालावर लहान मुलांपासून तरुण मुलांनी आपापले डावपेच आखून प्रति स्पर्धकाला हरवले या संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन श्री थोरात यांनी अति उत्कृष्टपणे केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow