शोषण करणारी व्यवस्था बदला हाच भगतसिंग यांचा संदेश - काॅ. राम बाहेती
शोषण करणारी व्यवस्था बदला हाच भगतसिंगांचा स॔देश - काॅ राम बाहेती औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) स्वतंञ भारत जर समाजवादी झाला नाही तर भ्रष्ट,शोषक, व साम्प्रदायिक देश होईल असा भगतसिंगाने वर्तवलेले भविष्य खरे ठरले आता दुस-या स्वातंञ्य लढ्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन कामगार नेते काॅ राम बाहेती यांनी केले. शहीद भगतसिंगांच्या 116 व्या जयंतिनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गणेश विसर्जन असतांनाही भगतसिंगाची आठवण ठेवुन कामगार, विद्यार्थी जमा झाले याचे कौतुक वाटते असही ते म्हणाले. कंञाटी कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी, फेरीवाल्यांना न्याय मिळवण्यासाठी, मोलकरणींना रेशन व्यवस्था वाचवण्यासाठीच्या लढ्यात भगतसिंगच मदत करणार आहे, भगतसिंगाच्या स्वप्नातील भारत साकार झाला असता तर आज महागाई बेरोजगारी सारख्या समस्या निर्माण झाल्याच नसत्या असेही ते म्हणाले. या वेळी अॅड अभय टाकसाळ, काॅ जॅक्सन फर्णांडीस,काॅ अश्फाक सलामी, कीरणराज पंडीत यांची भाषणेही झाली. कार्यक्रमाचे सुञसंचलन काॅ विकास गायकवाड यांनी केले, प्रास्ताविक काॅ अनिता हिवराळे यांनी आभार प्रदर्शन काॅ अॅड अय्याज शेख यांनी केले. यावेळी भगतसिंगाच्या प्रतिमेला काॅ पुष्पा बिरारे यांनी पुष्पहार घातला. यावेळी काॅ राजु हिवराळे, अॅड विद्या टाकसाळ, काॅ मनिषा भोळे, काॅ बाबुलाल वाघ, काॅ चंद्रकला नावकर, काॅ अर्चना घाटे, काॅ राजु रोजेकर, काॅ मधुकर खिल्लारे, काॅ वसुधा कल्याणकर, यांच्यासह मोठ्या संख्येने कामगा, फेरीवाले विद्यार्थी उपस्थित होते.
What's Your Reaction?