बालरोग शल्यक्रीयातज्ज्ञ्यांची राष्ट्रीय परिषद 2 ते 5 नोव्हेंबर पर्यंत

 0
बालरोग शल्यक्रीयातज्ज्ञ्यांची राष्ट्रीय परिषद 2 ते 5 नोव्हेंबर पर्यंत

बालरोग शल्यक्रियातज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद...

• वरिष्ठ बालरोग शल्यक्रियातज्ज्ञांचे मार्गदर्शन.

• लहान मुलांवरील शस्त्रकियांचा होणार अभ्यास

औरंगाबाद,दि.29(डि-24 न्यूज) बालरोग शल्यक्रिया संदर्भातील राष्ट्रीय आंतराष्ट्रीय तज्ज्ञांना एकत्र आणून त्यांच्या ज्ञानाची आदानप्रदान व्हावी, मराठवाड्यातील डॉक्टरांनाही त्याचा लाभ व्हावा यासाठी इंडियन असोसिएशन ऑफ पेडीयाट्रिक्स सर्जन कॉन्फरन्स (आयएपीस) अर्थात बालरोगशल्यचिकित्सक आणि बालरोग मूत्रमार्ग शल्यचिकित्सकांची (पेडियाट्रिक सर्जन्स) राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. अतिशय अवघड वैद्यकीय शाखा असलेल्या या विषयाचा अभ्यास आणि या क्षेत्रातील वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन यावेळी मिळणार असल्याने पेडियाट्रिक सर्जन्सबरोबरच बालरोग तज्ज्ञ, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यासाठी ही परिषद ज्ञानार्जनाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

परिषदेविषयी माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन पेडियाट्रिक सर्जन्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी परिषदेच्या संदर्भात विस्तृत माहिती दिली. बालरोगतज्ज्ञ शल्यचिकित्सा ही शाखा दिवसोंदिवस विकसित होत आहे. जनसामान्यात बालरोग शल्यक्रिया संबंधीची माहिती, या क्षेत्रात नव्याने येणारे तंत्रज्ञान, बालशल्यचिकित्सकाव्दारे उपचार करण्याचे फायदे, याची माहिती डॉक्टरांना व्हावी हा या उददेशाने दि.2 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान करण्यात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

लॅप्रोस्कोपी, रोबोटीक्स, आर्टिफिशीयल इंटटिलीजन्स अर्थात कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर शल्यचिकित्सेच्या क्षेत्रात वाढत आहे. बालरोगशल्यचिकित्सा क्षेत्रातही या आधुनिक पध्दतींचा वापर वाढला आहे. गर्भातील बालकावरील शस्त्रक्रियांबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान समोर येत आहे. हे ज्ञान प्रत्येक डॉक्टरांपर्यत पोहचवायचे असेल तर परिषदांची आवश्यकता असते. त्यामुळेच मराठवाड्याची राजधानीत करण्यात आली आहे असे संयोजन समितीचे सचिव डॉ. आर.जे.तोतला यांनी सांगितले. ही 49 परिषद आहे आणि औरंगाबादला पहिल्यांदाच परिषद भरवण्याचा मान मिळाला आहे. 

प्रत्यक्ष शस्त्रक्रियांचा अनुभव, बालशल्यचिकित्सकेतील आधुनिक तंत्र, ज्ञान याबरोबरच 100 च्यावर संशोधन निबंध, पोस्टर,चर्चासत्रे अशी ज्ञानाची भरगच्च मेजवानी पाच दिवसांच्या परिषदेच्या दरम्यान मिळणार आहेत. 400 प्रतिनिधींनी परिषदेसाठी नोंदणी केली आहे.सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी, नेपाळ, अमेरिका येथून सुमारे 20 तज्ज्ञ परिषदेत प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत तर कॅलिफोर्निया, जर्मनी आणि पोलंड येथील तज्ज्ञ ऑनलाईन या परिषदेत सहभागी होणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष शस्त्रक्रियांनी परिषदेस सुरुवात होईल.3,4,5 हे तीन दिवस विविध चर्चासत्रे, पेपर प्रेझेंटेशन होईल असे डॉ. राजगोपाल तोतला यांनी यावेळी सांगितले. 

परिषदेचे उदघाटन 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता केंद्रिय अर्थराज्यमंत्री आणि संघटनेचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे डॉ. रमेश बजाज, डॉ. सय्यद कैसरोददीन डॉ.मुख्तदिर अन्सारी, डॉ. विद्यानंद देशपांडे, डॉ. पिनाकीन पुजारी, , डॉ. रामदास नागरगोजे, डॉ. प्रदीप राठोड, डॉ. संदिप हंबरडे, डॉ, अर्जून पवार, यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow