रोशनगेट, पंक्चरच्या दुकानावर छापा, गांजा नशेच्या गोळ्या चाकू मिळाल्याने खळबळ...

 0
रोशनगेट, पंक्चरच्या दुकानावर छापा, गांजा नशेच्या गोळ्या चाकू मिळाल्याने खळबळ...

रोशनगेट, पंक्चरच्या दुकानावर छापा, गांजा नशेच्या गोळ्या मिळाल्याने खळबळ... पंक्चरच्या दुकानात सुरू होता अवैध नशेचा गोरखधंदा...

मुजीब काॅलनी येथील ड्रग्स पेडलर नियाज नजीर शेख याची पोलिसांनी रोशन गेटवर धिंड काढली...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) शहर नशा मुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून एकामागून एक छापे सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी अचानक पथक व जीन्सी पोलिसांनी नॅशनल स्पेअर पार्ट एण्ड पंक्चर दुकानावर छापा टाकला. यामध्ये गांजा, नशेच्या गोळ्या, चाकू व प्रतिबंधित पान मसाला गुटख्या, सुगंधित तंबाखू बाळगताना मिळून आले. एकूण 24,042 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कार्यवाईत दोन आरोपिंना अटक करण्यात आली आहे. अजहर खान सरवर खान, वय 38, राहणार बारी काॅलनी, गल्ली नं.5, छत्रपती संभाजीनगर, मुसा शेख, वय अंदाजे 42 , राहणार बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जिंन्सी पोलिस ठाण्यात गु.नं.251/2025 कलम एन.डी.पी.एस.कायदा 1985 चे कलम 8(सी),20(ब), 22(ए), 29 सहकलम 123 भारतीय न्याय संहिता 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कार्यवाईत 22 हजार रुपये किंमतीचे उग्रग वासाचा कळिदार ओलसर व काही सुकलेला(कॅनबीस वनस्पती) गांजा ज्याचा रंग काळा व मेहंदी सारखा गडद असा गांजाच्या छोट्या प्लास्टिकच्या एकूण 127 पाऊच सोबत आणलेल्या वजन काट्यावर वजन केले असता लाल रंगाच्या प्लॅस्टिकच्या पाॅलिथीनमध्ये एकूण वजन 1 किलो 159 ग्रॅम. कॅप्सूलच्या आकाराच्या पांढ-या रंगाचे टॅबलेट असलेले 16 छोटे प्लास्टिक पाऊण ज्यामध्ये प्रत्येक पाऊचमध्ये 10 गोळ्या गोल गोल आकाराचे पांढरे रंगाच्या टॅबलेट असलेले 7 छोटे प्लास्टिक पाऊच ज्यामध्ये प्रत्येक पाऊचमध्ये 10 गोळ्या, तीन लोखंडी धातुचे चाकू, गोवा गुटख्याच्या 44 पुड्या, हिरा पान मसाला 62 पुड्या, राजकमल पान मसाला 113 पुड्या, RK जालानी जर्दा सुगंधित तंबाखू 90 पुड्या, राॅयल 717 टोबॅको असे लिहिलेले 63 पुड्या. गांजा ठेवण्यासाठी ट्युबचा वापर करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदम करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow