जुगार अड्ड्यावर छापा, 18 आरोपी ताब्यात...!
जुगार अड्ड्यावर छापा, ग्रामीण पोलिसांनी 18 आरोपिंना घेतले ताब्यात ...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)
पो.स्टे. वैजापूर येथे लाडगाव रोडवर देवगिरी हॉस्पिटलच्या समोर शिवशंकरनगर येथे बांधकाम चालू असलेल्या रो हाऊसमध्ये चालू असलेल्या जुगार अड्यावर विशेष पथकाची धाड 18 आरोपी ताब्यात तर सदर कारवाईत एकुण 5,17,740/-रु. चा मुद्देमाल जप्त...
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयातील छुप्या मार्गाने जुगार अड्डड्यावर गोपनिय माहिती काढून त्यांचेवर पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाद्वारे छापेमारी करुन गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकास माहिती मिळाली की, पोलीस ठाणे वैजापूर कार्यक्षेत्रातील वैजापूर येथील लाडगाव रोडवर देवगिरी हॉस्पिटलचे समोरील शिवशंकरनगर येथे बांधकाम चालू असलेल्या एका रो-हाऊसमध्ये काही इसम पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सपोनि भरत मोरे यांचे पथकासह छाप्याचे नियोजन करुन त्यांचेवर पंचासमक्ष अचानक छापा मारुन 18 आरोपीतांना ताब्यात घेतले असून त्यांचे ताब्यातून रोख रक्कम 46,240/-रु. 16 मोबाईल, 4 दुचाकी वाहने, 1 चारचाकी वाहन असे एकुण 5,17,740/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमुद कारवाई ही डॉ. विनयकुमार मे. राठोड पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील सपोनि श्री. भरत मोरे, पोह/जावेद शेख, संदीप आव्हाळे, पोअं/विनोद जोनवाल व कल्याण खेडकर यांनी केलेली आहे.
What's Your Reaction?