मनोज जरांगे पाटील यांचे सरकारला 25 जानेवारीचे अल्टिमेटम, आमरण उपोषणाला सुरुवात करणार
मनोज जरांगे पाटील यांचे सरकारला 25 जानेवारीचे अल्टिमेटम, आमरण उपोषणाला सुरुवात करणार
आंतरवाली सराटी, दि.17(डि-24 न्यूज) सगेसोय-यांची अंमलबजावणी, मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने 25 जानेवारी 2025 पर्यंत घेण्याचे अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिले आहे. याच दिवशी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी इशारा दिला आहे गोरगरीब मराठा समाजासाठी आकस, द्वेष ठेवू नये तुम्ही लवकर निर्णय घ्या नसता मोठ्या प्रमाणात आंतरवाली सराटी येथे कधी न झालेले आंदोलन सुरू करणार आहे. ज्या श्रीमंत मराठ्यांनी येथे येऊन राजकीय पोळी भाजली ते येथे आता दिसणार नाही. गोरगरीब मराठ्यांनाच हि लढाई लढावी लागणार आहे. मराठा समाजाला शांततेत येथे येण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. तुम्ही उपोषणाला बसले नाही तरी चालेल परंतु सोबत पिठ, स्वयंपाकाचे सामान, जी वाहने आपल्याकडे असतील ट्रक, जीप, मोटारसायकल इत्यादी वाहने साहित्य घेऊन मुलाबाळासह आंतरवाली सराटी येथे सर्व कामे उरकून 25 जानेवारीला यावे. आरक्षण मिळेपर्यंत येथून आता उठायचे नाही. गावा गावात बैठका सुरू करावे. "चलो आंतरवाली सराटी" अशा आशयाचे पत्रिका गावा गावात व घराघरात पोहोचले पाहिजे. 25 जानेवारीला लग्नाची तारीख निश्चित न करता येथे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सरकारने मराठा समाजाचे मागण्या मान्य करावे नसता राज्यात मोठे व भयानक आंदोलन उभे करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
What's Your Reaction?