आमिनभाई जामगांवकर यांना विविध पक्ष संघटनांच्या वतीने श्रध्दांजली

 0
आमिनभाई जामगांवकर यांना विविध पक्ष संघटनांच्या वतीने श्रध्दांजली

भटक्या विमुक्तांचे संघर्षशील नेते आमिनभाई जामगांवकर यांना विविध पक्ष संघटनांनी दिली श्रद्धांजली....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.5(डि-24 न्यूज) भटक्या विमुक्तांच्या हक्कांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणारे ज्येष्ठ नेते आमिनभाई जामगांवकर (वय 53) यांचे सोमवारी उशिरा रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने भटके विमुक्त समाजाचा एक आधारवड हरपल्याची भावना त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमांमध्ये अनेकांनी व्यक्त केली.

गंगापूर तालुक्यातील छोट्या खेड्यातून आपल्या संघर्षमय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या जामगांवकर यांनी स्व. मोतीराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भटक्या विमुक्त समाजाच्या न्यायहक्कांसाठी लढा दिला. प्रा मोतीराज राठोड , तोताराम राठोड यांच्या सोबत त्यांनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. गावखेड्यात जाऊन भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले.

भटक्या विमुक्त दिन (31 ऑगस्ट) दरवर्षी साजरा करून त्यांनी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ भटक्या विमुक्तांना मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने सरकारदरबारी आवाज उठवला.

त्यांच्या निधनानंतर बुधवारी गांधी भवन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, चुन्नीलाल जाधव, तोताराम जाधव, सुभाष लोमटे, इब्राहिम पठाण, अॅड. अभय टाकसाळ, के. ई. हरदास, स. सो. खंडाळकर, गजानन बोदडे, आबेद जामगावकर , आतिक जामगावकर , आवेस जामगावकर , इर्शाद पठाण , दिग्वीजय शिंदे , मधुकर गायकवाड , लालचंद मोरे , प्रा सुनिल जाधव , अमीन पठाण , युसूफ पटेल , मधूकर भोळे रतनकुमार साळवे, देविदास कोळेकर, अशोक धनगावकर, ॲड . महादेव आंधळे , सादीक शेख , कीरणराज पंडीत , नारायण जाधव , डॉ मच्छींद्र गोर्डे ,  

यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow