गायरानातील गौण खनिजाची चोरी करणा-यांवर गुन्हे दाखल करा...!

 0
गायरानातील गौण खनिजाची चोरी करणा-यांवर गुन्हे दाखल करा...!

गायरानातील गौण खनिजाची चोरी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा 

गेवराई येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) मौजे गेवराई गावातील गायरानातील गौण खनिजांची चोरी करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या गायरानातून मुरूम मुरूम चोरणाऱ्या वर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावेत. गावातील ग्रामस्थांना धमक्या देणाऱ्या वर कारवाई करावी या व इतर मागण्यासाठी मौजे गेवराई येथील ग्रामस्थांनी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दिनांक 17 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मौजे गेवराई गावातील गट क्रमांक 15 मधील गायरान जमिनीवर या गावातील अनुसूचित जाती जमाती लोक पोट भरतात परंतु काही भूमाफियांनी गायरान जमिनीवरील मुरूम व गौण खनिजांची चोरी सर्रास सुरू केली आहे. मज्जाव करणाऱ्या ग्रामस्थांना भूमाफियाकडून धमक्या दिल्या जातात गेवराई गावातील सरकारी गायरानातील गौण खनिजाची चोरी करणाऱ्या वर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना धमकी देणाऱ्या वर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावेत. गौण खनिजाचे भरपाई आरोपीकडून तात्काळ वसुली करावी. गायरान धारकांना धमक्या देणाऱ्या लोकांना त्वरित अटक करावी आदी मागण्यासाठी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. दीपक खिल्लारे, किशोर ससाने, ॲड शिरीष कांबळे, ॲड. प्रवीण कांबळे, प्रा. प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद थोरात, अशोक गायकवाड, मायाबाई केदारे, शशिकलाबाई थोरात, चंद्रकलाबाई केदारे व इतर ग्रामस्थांनी आज शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेण्यात येणार नाही असा इशारा डॉ. दीपक खिल्लारे यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow