जमिन सुधारणा उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
जमिन सुधारणा उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.16 (डि-24 न्यूज)- रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांच्या वापरामुळे शेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कृषी विभागाने जमिन सुधारणा उपाययोजना राबवाव्या व सेंद्रिय शेतीला चालना देणारे उपक्रम राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा आज जिल्हास्तरीय समितीमार्फत घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. मधुरिमा जाधव, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ मोरे, सहा. प्रकल्प संचालक आत्मा डॉ. ए.के. वाडिले, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्या. जेणेकरुन लोकांना विषमुक्त अन्न पिकवून देता येईल. त्यासाठी सेंद्रीय शेतीला चालना द्यावी. यावेळी प्रधानमंत्री पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, वसुंधरा पाणलोट विकास योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, शेतकऱ्यांना आपत्ती प्रसंगी मदत देण्याच्या योजनांबाबत इ- ऑफिस प्रणालीचा अवलंब करावा. मदत देण्यातली विलंबितता दूर करावी. तसेच महिला बचत गटांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ देण्यात यावा,असेही निर्देश दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow