इम्तियाज जलिल यांच्या मन्नत बंगल्यावर पोलिस...!

इम्तियाज जलिल यांच्या मन्नत बंगल्यावर पोलिस...!
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)-
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्या मन्नत बंगल्यावर पोलिस दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाला आहे.
इम्तियाज जलिल यांच्या विरोधात शहरात त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी भव्य मोर्चा निघाला होता तेव्हापासून राजकारण तापलेले आहे. संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी जेव्हा पोलिस दाखल झाली कार्यकर्त्यांचा जमाव तेथे जमला होता. सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी व अन्य अधिकारी आत गेले. काही वेळेनंतर ते बाहेर आले आणि निघून गेले त्यानंतर इम्तियाज जलिल यांनी माध्यमांशी संवाद साधला. इम्तियाज जलिल यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला त्यांनी बेल घेण्यास नकार दिला. ते स्वतः न्यायालयिन लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले आज पोलिसांनी त्या केस बद्दल स्टेटमेंट घेतले आहे. एका मंत्र्याच्या दबावाखाली हा गुन्हा पोलिसांनी शहानिशा न करता दाखल केला आहे तो खोटा एफआयआर माझ्या विरोधात केलेला आहे. माझ्या विरोधात मोर्चा काढणा-या कथित नेत्यांनी भडकल गेट येथे व्यासपिठावरुन आपल्या भाषणात घाणेरड्या शब्दांचा वापर व शिव्या दिले ते पोलिसांना दिसत नाही का...? त्यांना परवानगी देताना गाईड लाईन दिली होती तरीही अपशब्द वापरले तरीही पोलिस त्यांच्यावर कार्यवाई करत नाही हा कोणता न्याय आहे...? त्यांच्या हुन मोठा मोर्चा मी काढू शकतो पण ते आम्ही केले नाही. असले खोटे गुन्हे कोणावरही दाखल होऊ शकतात म्हणून मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशिर लढाई लढणार आहे. असा इशारा त्यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






