ठाकरे बंधू एकत्र, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर शिंदे सेनेत तर शहराध्यक्ष भाजपात...
ठाकरे बंधू एकत्र, मनसेचे पदाधिकारी शिंदे सेना व भाजपात प्रवेशाने धक्का...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांनी आज मुंबईत युतीची घोषणा केली तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तर शहराध्यक्ष आशिष सुरडकर व गजन गौडा कार्यकर्त्यांसह यांनी भाजपात प्रवेश केल्याने ऐन महापालिका निवडणुक समोर असताना धक्का बसला. या महापालिका निवडणुकीत उबाठा व मनसे युतीत लढणार आहे अशा परिस्थितीत मनसेचे युनिट दोन्ही पक्षांत गेल्याने आता काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
What's Your Reaction?