भाजपाने सेवा पंधरवाडा म्हणून मोदींचा वाढदिवस केला साजरा...

 0
भाजपाने सेवा पंधरवाडा म्हणून मोदींचा वाढदिवस केला साजरा...

मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवडा 2025 अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर – 79 पेक्षा जास्त अधिक पदाधिकाऱ्यांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) - भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात सेवा पंधरवडा 2025 अंतर्गत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून IMA हॉल, छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टी गुलमंडी मंडळ व भाजपा महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह अभूतपूर्व असा पाहायला मिळाला. 79 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून समाजसेवेची ठोस नोंद केली. सेवा पंधरवड्यातील या उपक्रमाने “सेवा हीच संघटना” या भावनेला अधोरेखित करत पक्षाची जनसेवेची परंपरा अधिक दृढ केली.

या शिबिरास प्रमुख मान्यवर म्हणून. खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, माजी महापौर बापु घडामोडे, प्रदेश सचिव किरण पाटील, मनोज पांगरकर व प्रवीण घुगे या अभियानाचे संयोजक प्रशांत भदाणे पाटील, सर्व सरचटणीस, मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव यांनीही शिबिरास भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

या कार्यक्रमाचे विशेष आयोजन भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा डॉ. उज्वला दहिफळे व भाजपा गुलमंडी मंडळ अध्यक्ष महेश मल्लेकर यांच्या संपूर्ण टीमने केले होते. त्यांच्या नेतृत्वाखालील या कार्याने समाजसेवेची परंपरा अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे सर्वांगीण मार्गदर्शन भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांनी केले. त्यांनी शहरातील नागरिक, महिला, युवक व कार्यकर्त्यांना सेवा पंधरवड्यातील विविध उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow