फुलंब्रीत भाजपाच्या सत्तेचे पतन, महाविकास आघाडीचे राजेंद्र ठोंबरे नगराध्यक्ष तर 12 नगरसेवक विजयी

 0
फुलंब्रीत भाजपाच्या सत्तेचे पतन, महाविकास आघाडीचे राजेंद्र ठोंबरे नगराध्यक्ष तर 12 नगरसेवक विजयी

फुलंब्रीत भाजपाची सत्ता गेली- 1797 मतांनी राजेंद्र ठोंबरे विजयी

महाविकास आघाडीचा दणदणीत कौल

फुलंब्री, दि.21(डि-24 न्यूज) - फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत भाजपाची दीर्घकाळची सत्ता उलथवून टाकली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांचा 1797 मतांनी दारुण पराभव करत नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला आहे.

नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत राजेंद्र ठोंबरे यांना 8214 मते मिळाली, तर भाजपाचे सुहास शिरसाठ यांना 6417 मते मिळाली. सुरुवातीपासूनच ही निवडणूक अतितटीची ठरणार असल्याचे संकेत होते. अखेर फुलंब्रीतील मतदारांनी बदलाला कौल देत भाजपाच्या एकहाती सत्तेला स्पष्ट नकार दिला. नगरसेवक निवडणुकीतही महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण 17 प्रभागांपैकी महाविकास आघाडीचे तब्बल 12 नगरसेवक निवडून आले असून भाजपाला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचे स्पष्ट बहुमत प्रस्थापित झाले आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. आमदार अनुराधाताई चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व डॉ. भागवत कराड यांच्या जाहीर सभा घेण्यात आल्या. मात्र मोठ्या नेत्यांच्या प्रचारालाही मतदारांनी न जुमानता भाजपाला धक्का दिला. हा निकाल म्हणजे फुलंब्रीतील भाजपाच्या कारभारावर जनतेने दिलेला कडाडून धिक्कार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विकासाच्या नावाखाली सत्तेचा माज दाखवणाऱ्या भाजपाला मतदारांनी जागा दाखवल्याचे बोलले जात आहे.

जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणार - राजेंद्र ठोंबरे 

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले की, निवडणुकीत जनतेला दिलेले सर्व आश्वासन पूर्ण करण्यात येतील. सोमवारपासून शहरातील विकासकामांना अखंडित सुरुवात केली जाईल. फुलंब्रीच्या विकासासाठी सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करण्यात येईल.

विजयाच्या क्षणी भावनांचा पूर

नगराध्यक्षपदी विजय मिळाल्यानंतर राजेंद्र ठोंबरे यांनी पत्नीशी फोनवर संवाद साधला. या वेळी आनंद आणि संघर्षाच्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर झाले. दीर्घ काळाच्या राजकीय प्रवासानंतर मिळालेल्या या यशाचा क्षण भावूक करणारा ठरला.

अंबादास दानवे यांनी एकट्याने खिंड लढवली आणि विजय खेचून आणला . विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नंबरी मध्ये सहा कॉर्नर मीटिंग तसेच रॅली सभेला संबोधित केले त्यामुळे फुलंब्रीचे वातावरण ढवळून निघाले. अंबादास दानवे यांनी भाजप सह विरोधकांचा घेतलेला समाचार फुलंब्री शहरात प्रभावी ठरला त्याचबरोबर काँग्रेसचे खासदार डॉ.कल्याण काळे यांनी दोन सभा व काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील फुलंब्री शहरांमध्ये सभा घेतल्या.

 अंबादास दानवे यांच्या सात सभा कॉर्नर मीटिंग व कल्याण काळे यांच्या दोन सभा प्रभावी ठरल्या... 

फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार 

नगराध्यक्षपद

राजेंद्र ठोंबरे शिवसेना (ठाकरे) विजयी 8214

सुहास शिरसाठ भाजपा 6417

नगरसेवक

प्रभाग क्रमांक 1

मिनाबाई एकनाथ ढोके भाजपा 356

अरशिया रिजवान खान विजयी काँग्रेस 387

प्रभाग क्रमांक 2

द्वारका संतोष जाधव विजयी भाजपा666

पूजा हरिदास घरमोडे शिवसेना (ठाकरे)130

प्रभाग क्रमांक 3

हलीमाबी मजीद कुरेशी रा.कॉ.(शरद पवार) विजयी 329

अश्विनी उत्तम ढोके भाजपा 174

प्रभाग क्रमांक 4

जमीर सगिर पठाण काँग्रेस विजयी 380

मंगेश संजय गुंजाळ शिवसेना शिंदे 219

रऊफ माणिक पटेल भाजपा 167

प्रभाग क्रमांक 5

हिना मुद्दसर पटेल काँग्रेस विजयी 669

बिस्मिल्लाबी जाफर पठाण रा.कॉ. (अजित पवार) 251

प्रभाग क्रमांक 6

जावेद याकूब पठाण शिवसेना (ठाकरे) विजयी 725 

योगेश सुरेश सोनवणे रा.कॉ. (अजित पवार) 197

प्रभाग क्रमांक 7

मसरत जफर चिस्ती शिवसेना (ठाकरे)विजयी 448

मीराबाई रवींद्र काथार भाजपा 408

प्रभाग क्रमांक 8

योगेश मधुकर मिसाळ भाजपा विजयी 857

नरेंद्र बाबुराव सीमंत शिवसेना (ठाकरे) 134

प्रभाग क्रमांक 9

 सुष्मेश राजू प्रधान शिवसेना (ठाकरे) 458

सुमित सुरेश प्रधान भाजपा 329

प्रभाग क्रमांक 10 

वाल्मिक लक्ष्मण जाधव भाजपा विजयी 496

हरिदास कचरू घरमोडे शिवसेना (ठाकरे) 462

प्रभाग क्रमांक 11

अर्चना उमेश दुतोंडे शिवसेना (ठाकरे) विजयी 528

आशा कृष्णा शिनगारे भाजपा 240

प्रभाग क्रमांक 12

गणेश कृष्णा राऊत भाजपा विजयी 649

सांडू काशिनाथ हापत शिवसेना (ठाकरे)260

प्रभाग क्रमांक 13

राणी पवन घोडके शिवसेना (ठाकरे) विजयी 402

शारदा अजय शेरकर भाजपा 377

प्रभाग क्रमांक 14 

देविदास नागोराव ढंगारे भाजपा विजयी 700

विलास आसाराम शेरकर काँग्रेस 219

मनोज आसाराम कुदळे शिवसेना (ठाकरे)203

प्रभाग 15

प्रशांत राजेंद्र नागरे काँग्रेस विजयी 661

गजानन दत्तात्रेय नागरे भाजपा 322

प्रभाग क्रमांक 16

शेख सना उमर शिवसेना (ठाकरे)विजयी 427

लिलाबाई पंडित नागरे भाजपा 208

प्रभाग क्रमांक 17 

शहा आन्नोबी जमील शिवसेना (ठाकरे) विजयी 465

सायमा इंद्रिस कुरेशी भाजपा 215

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow