जिल्ह्यात महायुतीला 4, काँग्रेसला 2, ठाकरे गटाला एक नगराध्यक्ष पद, कार्यकर्त्यांचा जल्लोष

 0
जिल्ह्यात महायुतीला  4, काँग्रेसला 2, ठाकरे गटाला एक नगराध्यक्ष पद, कार्यकर्त्यांचा जल्लोष

महायुतीला 4 नगराध्यक्ष पद तर काँग्रेसला 2, ठाकरे गटाला एक नगराध्यक्ष पद...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- आज राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लागले. अटीतटीच्या लढतीत जिल्ह्यातील सात नगरपरिषदेतील आज निकाल लागले यामध्ये महायुतीला चार, काँग्रेसला दोन तर ठाकरे गटाला एक नगराध्यक्ष पद निवडून आले. अटीतटीच्या लढतीत फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे राजेंद्र ठोंबरे, सिल्लोड येथे शिंदे सेनेचे अब्दुल समीर अब्दुल सत्तार, खुलताबाद येथे काँग्रेसचे आमेर पटेल, कन्नड येथे काँग्रेसचे फरहिन जावेद शेख, वैजापूर येथे भाजपाचे दिनेश परदेशी, पैठण येथे विद्या कावसानकर, गंगापूर येथे अजित पवार गटाचे संजय जाधव हे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून अभिनंदन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow