जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मुंबईत बालस्नेही पुरस्कार प्रदान...!

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेशमा चिमंद्रे बालस्नेही पुरस्काराने गौरव
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)
बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मानआज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने ‘ बालस्नेही पुरस्कार 2024’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेश्मा चीमंद्रे यांचा सन्मान बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे,राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनीषा कायंदे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्र्वती दोर्जे, आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत
यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैन, शिक्षण अधिकारी माधुरी भोसले, सदस्य नीलिमा चव्हाण, जयश्री पालवे, सायली पालखेडकर, संजय सिंगल, चैतन्य पुरंदरे, आदिसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भातील जनजागृतीसाठी आवश्यक भित्तीपत्रीकेचे व मुलांच्या काळजी आणि संरक्षण नियमावलीत केलेल्या सुधारणा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.
बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रीय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खाजगी स्वयंसेवी संस्था यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारी, म्हणून संभाजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, श्रीमती रेशमाची चिमंद्रे , यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यास प्राप्त बालस्नेही पुरस्कार
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपआयुक्त
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेशमाची चिमंद्रे,
जिल्हा बाल संरक्षण कक्ष,
केअर लिव्हर बालक एक मुलगी.
केअर लिव्हर बालक एक मुलगा.
बाल कल्याण समिती,
निरीक्षणगृह /बालगृह छत्रपती संभाजी नगर, जय किशन शिक्षण संस्था छत्रपती संभाजी नगर,पोलीस आयुक्तालय शहर यांच्या कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी. यांचा सन्मान करण्यात आला.
What's Your Reaction?






