मंत्री अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर, दिले पंचनाम्यातचे आदेश

इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे शेतकऱ्यांच्या बांधावर;
त्वरीत पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- वीरगाव तसेच भग्गाव, कापूस वडगाव ता. वैजापूर या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा, दुग्धविकास, दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे हे आज थेट शेतकऱ्याच्या बांधावर गेले. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसिलदार सुनिल सावंत, तलुक कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर तसेच ग्राम महसूल अधिकारी ,ग्रामपंचायत अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी तसेच तहसिलदार,तालुका कृषी अधिकारी आणि गट विकास अधिकारी व सर्व विभागांचे प्रमुख होते.
मंत्री अतुल सावे यांनी आज वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. वीरगाव परिसरात मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून भग्गाव परिसरात सोयाबीन, ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे भरीव मदत देण्याची ग्वाही श्री. सावे यांनी यावेळी दिली. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा दिलासाही दिला. यावेळी स्थानिक शेतकरी अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






