देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता महालांमध्ये - विजया रहाटकर

देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता महिलांमध्ये
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि. 24(डि-24 न्यूज) - घरात सर्व काम करून सर्व कुटुंबांना सांभाळून जी सर्वांच्या पुढे राहते अशी महिला या देशाचे नेतृत्व करू शकते असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी गुरुवारी केले. छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघाच्या कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव, नवरात्र उत्सव महासंघाच्या अध्यक्षा मनीषा संजय भन्साळी यांनी त्यांचे स्वागत केले. पुढे बोलतांना विजया रहाटकर म्हणाल्या की, मा दुर्गेला आठ हात आहेत एकाच वेळी तिला आठ कामे जमतात. म्हणजेच ती अष्ठावधारी आहे. ही शिकवण देणारी ती श्रद्धेचे प्रतीक असून आजच्या स्रियामध्ये ऊर्जा निर्माण करणारी मोठी शक्ती आहे. आपण या नवरात्र उत्सवात तिच्या शक्तीचा जागर करत आहोत त्यामुळे तिच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी नांदो अशी भावना व्यक्त करत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी देवी मातेला साकडे घातले. यावेळी छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघाचे सरचिटणीस विनोद माने, उपाध्यक्ष स्मिता साहुजी, समाधान जरांगे पाटील, सचिव विधिज्ञ कल्याण खोले पाटील, संजय भन्साळी, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांची उपस्थिती होती. यावेळी भवानी नगर येथील संत तुकाराम महिला भजनी मंडळाने विविध भजन सादर केले.
What's Your Reaction?






