हज हाऊसचे उद्घाटन लवकर करण्याची मागणी, आमदार प्रदीप जैस्वाल यांना निवेदन
हज हाऊसचे उद्घाटन लवकर करण्याची मागणी, आमदार प्रदीप जैस्वाल यांना निवेदन
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) पवित्र हज यात्रा 2024 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सेंट्रल हज कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे. शहरात भव्य हज हाऊसची इमारत बनून तयार आहे पण शासनाच्या वतीने उद्घाटनास विलंब होत असल्याने मुस्लिम समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे. या हज हाऊसचे लोकार्पण लवकर व्हावे अशी मागणी औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना अखिल भारतीय विकास परिषदेचे अध्यक्ष हामद चाऊस यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी आश्वासन दिले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करून लवकर लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येईल.
याप्रसंगी माजी महापौर रशिद खान मामू, राष्ट्रवादीचे इलियास किरमानी, हाफीज मुख्तार, माजी नगरसेवक अफसरखान, रफत खान, नासेर नाहदी चाऊस, हाजी इसा कुरेशी, माजी नगरसेवक अयूब खान, समाजवादीचे अब्दुल रऊफ, मतीन सईद, मुसा कुरेशी, अकबर कुरेशी, सादीक कुरेशी, नदीम कुरेशी, नाजिम कुरेशी, मोहंमद रिजवान, नजर आलम खान, इर्शाद कुरेशी, हाफिज अबुबकर पठाण, डॉ .एम.ए.समी नदवी, हाफीज नसिरुद्दीन आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?