सावधान, शहरात कोरोना वाढत आहे, आज 8 रुग्णांचा रिपोर्ट पाॅझिटीव

सावधान, शहरात कोरोना वाढत आहे, आज 8 रुग्णांचा रिपोर्ट पाॅझिटीव
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) आज शहरात 8 रुग्णांचा अहवाल पाॅझिटीव आला आहे म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
आज VRLD कडून 39 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 4 रुग्णांचा अहवाल पाॅझिटीव आलेला आहे व 33 रुग्णांचा अहवाल हा निगेटिव्ह आहे. जिल्हा रुग्णालयाकडून स्वॅब घेतलेल्या पैकी 2 रुग्ण मनपा हद्दीतील पाॅझिटीव आलेले आहे. असे एकूण 8 रुग्ण पाॅझिटीव आलेले आहेत.
आज आढळलेले 8 रुग्णांपैकी 4 महीला व 4 पुरुष आहे. शहरात रुग्ण वाढत असल्याने घाबरून न जाता घरातील जेष्ठ नागरिक व Comorbility असलेल्या नागरीकांनी काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. एकूण सक्रीय रूग्ण 10 झाले आहे तर दोन रुग्णांना सुट्टी दिली आहे.
आज गुरुवारी शहरातील न्याय नगर, गल्ली नं.7, 40 वर्षीय पुरुष, रेंगटीपूरा 22 वर्षीय महीला, क्रांतीचौक 54 वर्षीय पुरुष, सिल्कमिल काॅलनी 31 वर्षीय पुरुष, हिना नगर, चिकलठाणा 35 वर्षीय महीला, म्हाडा कॉलनी सिडको एन-2, 56 वर्षीय महीला, सादातनगर 42 वर्षीय महीला आहे.
यापूर्वी तीन रुग्ण पाॅझिटीव निघाले आहे यामध्ये एन-7 सिडको येथील 10 वर्षीय मुलगी, 65 वर्षीय वृध्दा, व एक रुग्णाचा समावेश आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
What's Your Reaction?






