वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटन पत्रिकेवर खा.इम्तियाज जलिल यांचे नाव वगळले, एमआयएम अक्रामक, रेल्वेस्टेशनवर राडा
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार जलील चांगलेच संतापले... AIMIM अक्रामक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यासाठी कार्यकर्ते रेल्वेस्टेशन वर ... रेल्वे स्टेशनवर एमआयएमचे घोषणाबाजी करत राडा...
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) उद्या 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहे तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालना येथून या गाडीला हिरवी झेंडी देणार आहे. पण निमंत्रण पत्रिकेवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे नाव नसल्याने ते फार संतापले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या रेल्वेशी ज्या लोकप्रतिनिधींचा काही देणे घेणे नाही अशा खासदारांचे नाव टाकून माझे नाव का वगळण्यात आले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या नेत्याचे नाव निमंत्रण पत्रिकेवर लिहिले नसल्याने एमआयएमचे कार्यकर्ते अक्रामक झाले आहे त्यांनी रेल्वेस्थानक येथे डिआरएमचा घेराव करुन निवेदन दिले.
पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी सांगितले माझी काही एलर्जी त्यांना आहे का ? असा सवाल त्यांनी केला. शहरातील व जिल्ह्याचे सगळेच प्रश्न मी जास्त सभागृहात मांडले आहे.
माझा काय दणका आहे ते मी उद्या उद्घाटनापूर्वी दाखवतो असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलाय.
मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे मग असं राजकारण का करता. रेल्वे विभागाला त्यांनी खडसावले.
परभणी मधून ट्रेन जात नाही तरी त्या खासदार संजय जाधव यांचे नाव टाकण्याची गरजच काय ? माझ्या शहरातून रेल्वे जात असताना माझं नाव नाही असं का ?
उद्या रेल्वे उद्घाटना पूर्वी माझा दणका काय आहे ते तुम्ही फक्त बघाच मी माझ्या पद्धतीने कसं स्वागत करतो इम्तियाज जलील यांनी इशारा दिला आहे. त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
आम्ही उद्या रेल्वे स्वागताची कशी तयारी आमच्या पद्धतीने करतो ते तुम्ही फक्त बघाच.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा देखील मला फोन आला होता त्यांनी मला मुंबईला ट्रेनमध्ये यायला सांगितले होते.
रेल्वे कनेक्टिव्हिटी चा सगळ्यात जास्त आग्रह लोकसभेत मी उपस्थित केलाय.
तुम्ही मला बोलवा की नका बोलवू मात्र माझा काय दणका आहे ते दाखवतो.
तुम्ही राज्याचे मंत्री अतुल सावे यांचे नाव टाकले मात्र केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचं नाव नाहीये असं राजकारण का केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडून बाकी सर्वांसोबत माझे संबंध चांगले आहे त्यामुळे कुणाला ठोकून काढण्याची वेळ आली तरी काढू असेही ते रागात म्हणाले. पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, युवा शहराध्यक्ष मोहंमद असरार उपस्थित होते.
What's Your Reaction?