डॉ.ए.ए.कादरी मानसिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सप्ताह...

डॉ.ए.ए.कादरी मानसिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सप्ताह...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - पडेगाव येथील डॉ.ए.ए.कादरी मानसिक आरोग्य केंद्राने जागतिक आरोग्य सप्ताह-2025 निमित्ताने मानसिक आजारांवरील कलंक दूर करण्याचे व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जेष्ठ मानसिक आरोग्य तज्ञ डॉ ए. ए.कादरी यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले यावर्षीचे घोषवाक्य आहे "समाज मानसिक आरोग्याकडे एकत्रितपणे वाटचाल" या उपक्रमाचा उद्देश म्हणजे सामुहिक कृती, सहानुभूती आणि समावेशकता यांच्या माध्यमातून चांगल्या मानसिक आरोग्याकडे वाटचाल करणे. या आठवड्यात शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये तरुण पिढीला मानसिक आरोग्याबद्दल संवाद साधण्यास व विचारमंथन करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. या स्पर्धेत सहानुभूती, विविधतेतील ऐक्य आणि समाजाची मानसिकता आरोग्य घडविण्यातील भुमिका हे मुद्दे अधोरेखित केले जाणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिके व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
आजच्या विविधतेने नटलेल्या समाजात आपली खरी ताकद ही एकता, सहानुभूती आणि स्विकार यात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणून आम्ही मानसिक आजारांवरील कलंक दूर करण्याचे व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. केंद्राचा या उपक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी जागरुकता वाढविणे, कलंक कमी करणे आणि करुणा व समज वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतिक आहे.
या आहेत आजपासून स्पर्धा...
वादविवाद स्पर्धा - 22 सप्टेंबर 2025
पोस्टर बनविण्याची स्पर्धा - 23 सप्टेंबर 2025
नाटक, लघुनाट्य स्पर्धा - 24 सप्टेंबर 2025
भाषण स्पर्धा - 25 सप्टेंबर 2025
What's Your Reaction?






