एटीएम फोडणारी टोळी ग्रामीण पोलिसांनी केली जेरबंद...

ATM फोडणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पोलीसांनी केली जेरबंद....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - 11 सप्टेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथील कैलास हाॅटेल समोरील एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून 16,77,100 रुपये चोरुन नेले होते.
ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत टोळीला जेरबंद करुन मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी नामे विकास हुकुमचंद निकाळजे वय.41 वर्ष व्यवसाय चॅनेल मॅनेजर स्टेट बॅक अॅफ इंडिया, छत्रपती संभाजीनगर ए.टी.एम रिजनल मॅनेजर यांनी पोस्टे खुलताबाद येथे येवुन फिर्याद दिली कि, दिनांक 11/09/2025 रोजी रात्री 00.10 ते 03.25 वाजे दरम्यान अज्ञात चोरटयाने वेरुळ येथील कैलास हॉटेलसमोर असलेल्या स्टेट बॅक अॅफ इंडिया या बॅकेचे एटीएम मशिन एटीएम लॉबीमध्ये प्रवेश करुन एटीएम व त्यामधील शिल्लक रोख रक्कम 16,77,100/- रुपये चोरुन नेलेले आहे. वगैरे मजकुराचे फिर्याद वरुन पोलीस ठाणे खुलताबाद गुरनं 406/2025 कलम 305, 331(4), 3(5) भा. न्या. संहीता 2023 नमुद प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
नमुद गंभीर गुन्हयाचा तपासाबाबत डॉ. विनयकुमार मे. राठोड, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी नमुद गुन्हयाचा तपास जलत गतिने करुन आरोपी अटक करण्याच्या सुचना दिल्याने त्यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपुत, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नमुन गुन्ह्याचा कसोशीने तपास सुरु केला.
सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक यांनी गेल्या दहा दिवसापासुन वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय माहिती घेतली व तांत्रिक विश्लेषनाचे अधारे पथकाला समजले कि, एटीएम चोरी करते वेळी आरोपीतांनी MH- 20 GZ- 0439 क्रिम रंगाचे अशोक लेलंड मिनी टॅम्पो गाडी वापरल्याचे दिसुन आल्याने नमुद वाहनाची माहीती घेत असतांना सदर गाडी हि पोलीस स्टेशन सिडको, जि. छत्रपती संभाजीनगर शहर हद्दीतून भक्तीनगर येथून चोरी गेली असल्याबाबत खात्री झाली व पथकाला गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, इसम नामे सतबिरसिंग हरबनसिग कलानी रा.छोटा मुरलीधरनगर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर याने त्याचे साथीदारासह गुन्हा केल्याची खात्री झाली व त्याची आज दिनांक 22/09/2025 रोजी माहीती घेतली असता तो पडेगांव छत्रपती संभाजीनगर येथे त्याचे मित्राला भेटण्यासाठी गेल्याबाबत माहीती मिळाली त्यावरून पडेगांव येथे जावून सदर इसमाचा शोध घेत असतांना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली कि, सदर इसम आझादनगर पडेगांव येथे जिवन वाघ याचे घराजवळ काही लोकांसोबत थांबलेला आहे व त्यांचेकडे एक पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कंपनीची गाडी आहे, अशी पथकाला खात्रीलायक माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी पथकाने जावून खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून आझादनगर पडेगांव येथे जिवन वाघ याचे घराजवळ दोन पंचासह जावून छापा मारला असता तेथील ईसम पथकाला पाहून पळू लागले त्यांना पथकाने जागीच पकडले असता सदर ठिकाणी चार इसम मिळून आल्याने त्यांना त्यांचे नांव व पत्ता विचारले त्यांनी त्यांचे नांव 1) दयासिंग गुलजारसिंग टाक वय 45 वर्षे म्हाडा कॉलनी टी.व्ही. सेंटर सिरसवाडी, रोड जालना जि. जालना, जीवन विजय वाघ वय 28 वर्षे जळकेबाजार ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. नवकार कॉलेज जवळ आझाद नगर तारांगण सोसायटीच्या पाठीमागे पडेगांव ता.जि.छत्रपती संभाजीनगर, सतबिरसिंग हरबनसिंग कलानी वय 21 वर्षे रा. छोटा मुरलीधरनगर, साठे चौक जवळ, उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर, युवराज उर्फ इल्लम बाळासाहेब मंडोरे वय 44 वर्षे रा. बनेवाडी कुंभारवाडा रेल्वे स्टेशन जवळ छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद इसमांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले कि, दिनांक 10/09/2025 रोजीचे रात्री ते दिनांक 11/09/2025 रोजीचे पहाटे या कालावधी मध्ये वाकींग प्लाजा गार्डन छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही भेटून वेरूळ येथून एटीएम मशीन चोरी करण्याची चर्चा करून तेथून जीवन वाघ याचे पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट व्हीडीआय कंपनीची गाडी मध्ये भक्तीनगर येथे जावून एक अशोक लेलंड कंपनीचा मिनी टेम्पो चोरून सदर अशोक लेलंड कंपनीचा मिनी टेम्पो ने वेरूळ येथे जावून एटीएम मशीन व त्यातील रक्कमेसह चोरून घेवून गेलो व सदरचे एटीएम मशीन आझादनगर, तारांगण सोसायटीच्या पाटीमागे नवकार कॉलेजजवळ जीवन वाघ याचे बांधकाम चालु असलेल्या घरामध्ये इलेक्ट्रीक बोर्डला पिन लावुन विद्युत प्रवाह घेवून कटरच्या (ग्रँडर) सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम 16,77,100/- रुपये याची आपसात वाटणी केली कबुली दिली. त्यांची पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांचे ताब्यात नगदी 4,14,900/- रुपये, गुन्हयात वापरलेली एक मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट व्हीडीआय क्र. MH 02 DJ 1864, एक होंडा शाईन कंपनीची विना नंबरची मोसा (नविन), एकुण 07 मोबाईल व एटीएम फोडण्याचे साहित्य ड्रिल मशिन, इलेक्ट्रीक कटर मशिन, वायर रोफ, हातोडा, टॉर्च, लोखंडी कटोनी, नायलॉन नाडा, धाक दाखविण्यासाठी एअर गन, धारदार चाकु व इतर चोरी करण्याकरीता वापरण्याचे साहीत्य असे एकुण 12,70,540 रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकिस आणला आहे. नमुद आरोपीतांची वैद्यकिय तपासणी करुन त्यांना पोलीस स्टेशन खुलताबाद येथे पुढील कार्यवीही करिता हजर केले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन खुलताबाद हे करीत आहेत.
सदरची कारवाई डॉ. विनयकुमार मे.राठोड, पोलीस अधीक्षक, श्रीमती अन्नपुर्णा सिंह मॅडम, अपर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विजयसिंह राजपुत, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि सुधीर मोटे, पोउपनि महेश घुगे, पोह श्रीमंत भालेराव, प्रमोद पाटील, कासीम शेख, सचिन राठोड, अनिल चव्हाण, जनाबाई चव्हाण, कविता पवार, बलबिरसिंग बहुरे, आंनद घाटेश्वर शिवाजी मगर, योगेश तरमाळे, जिवन घोलप सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी केली आहे.
What's Your Reaction?






