महापालिका निवडणुकीत मतचोरीची शक्यता नाकारता येत नाही, कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे - डॉ.वजाहत मिर्झा

 0
महापालिका निवडणुकीत मतचोरीची शक्यता नाकारता येत नाही, कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे - डॉ.वजाहत मिर्झा

निवडून येण्याची क्षमता' अन् 'निष्ठावंत'...या दोन निकषाआधारेच मिळेल काँग्रेसचे तिकीट - डॉ.वजाहत मिर्झा 

महापालिका निवडणुकीत मतचोरीची शक्यता नाकारता येत नाही म्हणून इच्छूकांनी आतापासूनच मतदार यादी छाणणी करावी...जनतेत जाऊन समस्या जाणून घेऊन वार्डात बस्तान बांधून बसावे तरच निवडणूक जिंकता येईल... महापौर काँग्रेसचा होईल असा विश्वास शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी व्यक्त केला...

मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) - आगामी महापालिका निवडणुकीत पण मतचोरी होऊ शकते यासाठी कार्यकर्ते व इच्छूकांनी सतर्क राहावे. आत्तापासूनच मतदार यादीतील नावांची शहानिशा करावी. बोगस मतदार तर नाही, दुबार नावे आहेत का, दुस-या प्रभागाची नावे आहेत का...? सकाळ ते संध्याकाळ पर्यंत वार्डातील जनतेमध्ये राहुन समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करावे. जनसंपर्क वाढवून जनतेचा चेहरा बनावे. निवडणूक जिंकणे एवढे सोपे नाही. शहरात काँग्रेसचा आमदार खासदार नाही पण जनता सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. पाण्याचा व अनेक प्रश्न आहेत या सरकारने त्या सोडवले नाही. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून उमेदवार निवडताना 'निवडून येण्याची क्षमता आहे का' आणि 'तो पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे का' या दोनच निकषाआधारे उमेदवारी दिली जाणार आहे अशी घोषणा माजी आमदार तथा जिल्हा निरीक्षक वजाहत मिर्झा यांनी सोमवारी गांधी भवन येथे झालेल्या बैठकीत केली.

गांधी भवनात कार्यकर्तांची आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, निरीक्षक रिजवान सौदागर, विद्या पाटील, सुरेंद्र घोडजकर, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, डॉ. जफर अहेमद खान, डॉ. जितेंद्र देहाडे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचलन अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल यांनी केले. बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतले. अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवला जाईल असे पक्ष निरीक्षकांनी जाहिर केले. पदाधिकाऱ्यांनी खचून जावू नये, आशा ठेवा, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसचाच महापौर होणार, असे म्हणत शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविले.

मिर्झा म्हणाले की, रस्ता रुंदीकरणात सर्वसामान्यांची घरे पाडली, व्यवसाय-लहानमोठे उद्योग बंद केले, 10 ते 15 दिवसांनी मिळणारे पाणी आणि स्मार्ट सिटीचा दिखावा, आदी प्रश्न घेवून जनतेच्या दारी जाणार आहे. सध्याचा काळ कठीण आहे. याठिकाणी आपला एकही खासदार नाही, आमदार नाही, अशा परिस्थितीत तुम्ही काँग्रेस पक्ष टिकवून ठेवला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करण्यासाठी मी आलो आहे. आपले नेते खा. राहुल गांधी यांनी मत चोरीचा मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. आपल्याकडे अजूनही वेळ आहे, मतदार याद्या तपासा, बोगस मतदार शोधा, असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. नुसते पदे घेवून घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आता घरी बसवणार, काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाईल, असे सांगत त्यांनी सक्रीय कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow