अखलाख देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रसिध्दी प्रमुख पदाची जवाबदारी...
अखलाख देशमुख यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रसिध्दी प्रमुख पदाची जबाबदारी...
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) शहर जिल्ह्याच्या वतीने जेष्ठ पत्रकार अखलाख देशमुख यांची शहर प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची आणि सक्रिय भूमिकेची दखल घेऊन हा मान देण्यात आला. सिल्लोड तालुक्यातील अंभईचे उप सरपंच म्हणून राजकारणात प्रवेश केला. मराठवाड्यातील प्रथम हिंदी दैनिकात वार्ताहर म्हणून काम करण्याचा अनुभव असताना महाराष्ट्र वाणी मराठी न्यूज पोर्टल सध्या चालवत आहेत.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सहमतीने शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांनी अधिकृत नियुक्तीपत्र शहर जिल्हा बुध प्रमुख मोहम्मद हबीब उर्फ मुन्नाभाई यांच्या हस्ते प्रदान करताना देशमुख यांच्या कामाचा गौरव केला. पक्षाच्या धोरणांचा व्यापक प्रसार, संघटनात जनसंपर्क वाढवणे आणि जनतेपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवणे ही जबाबदारी देशमुख सांभाळणार आहेत.
नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, देशमुख यांनी पक्षशिस्त पाळून, एकजूट राखून आणि पक्षाच्या हिताला प्राधान्य देत आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अखलाख देशमुख हे मागील काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आणि संवादकौशल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढत आहे. शहर प्रसिद्धी प्रमुख या जबाबदारीमुळे त्यांच्या नेतृत्वाला नव्याने बळ मिळणार आहे.
पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करताना देशमुख म्हणाले की,
“शरद पवार साहेबांच्या विचारसरणीला आणि पक्षाच्या धोरणांना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना आवाज देणे हीच माझी प्राथमिकता असेल.” अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
What's Your Reaction?