शहरात शिंदे सेनेला भाजपाचा दे धक्का, शिल्पारानी वाडकर यांचा भाजपात प्रवेश...
शहरात शिंदे सेनेला भाजपाचा दे धक्का, शिल्पाराणी वाडकरांचा भाजपात प्रवेश...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- जसजसे महापालिका निवडणूक जवळ येत आहे राजकारण तापायला लागले आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असताना शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या महीला जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेविका शिल्पारानी वाडकर यांनी आज उस्मानपुरा येथील भाजपा कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते भाजपात अनेक महाला कार्यकर्त्यांसह जाहिर प्रवेश केला असल्याने भाजपा शिवसेनेत पुन्हा वाद उफाळला आहे.
फोडाफोडीचे लोण थांबवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली तरीही थांबायचे नाव घेत नाही. यामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गट व भाजपात एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यावरुन जोरदार वाद सुरू आहे. वादाची तक्रार अमित शाह यांच्याकडे केली तरीही फोडाफोडी कायम आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शिल्पारानी वाडकर यांच्या भाजपा प्रवेशाने आज बालेकिल्ल्यात मोठा झटका बसला आहे. सत्तेतील सरकारी पक्ष भाजपाने हा झटका दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू झाल्यापासून विविध पक्षातील उमेदवार व नेत्यांना फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांनंतर महापालिका व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपा प्रवेश झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वाडकर यांच्या सह 10 महीला व पुरुष पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. वाडकर यांनी पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले शिवसेनेत असताना याच विचाराने काम करत होते. पण आता मला पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करणे अधिक चांगले वाटल्याने प्रवेश केला आहे. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्तीगत कारणांमुळे राजीनामा दिला होता. त्यांना इतर पक्ष पक्षात घेण्यासाठी इच्छुक होते. पण त्यांचं काम चांगले आहे हे पाहता असा कार्यकर्ता महायुती बाहेर जावू नये म्हणून भाजपात प्रवेश करुन घेतला असे त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?