महायुतीत सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले नाही तर महाविकास आघाडी, एमआयएम सोबत जाण्यासाठी पर्याय खुला
महायुतीमध्ये सन्मानपूर्वक चर्चा झाली नाही तर महाविकास आघाडी व एमआयएम सोबत जाण्याचा पर्याय खुला - अभिजित देशमुख
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीसाठी इच्छूकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत परंतु महायुती व महाविकास आघाडी होईल का अजून स्पष्ट झाले नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजपा व शिंदे सेनेची प्राथमिक बैठक झाली. परंतु या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण दिले नसल्याने नाराजी समोर आली आहे. आज डि-24 न्यूजने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांच्याशी युतीबाबत बातचीत केली असता त्यांनी सांगितले महायुतीचे निमंत्रण मिळेल अशी अपेक्षा आहे. सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले आणि चर्चेत किती जागा मिळतील यावर तोडगा निघाला तर ठीक नाहीतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून स्वबळावर निवडणूक लढू किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्ष, एमआयएम, वंचित समविचारी पक्षांसोबत जाण्यासाठी पर्याय आहे. 29 प्रभागातून 240 इच्छूकांचे अर्ज आले आहे. मुलाखती घेतल्या जात आहेत. मुस्लिम बहुल प्रभागातून प्रत्येकी तीन ते चार दिग्गज उमेदवार इच्छुक आहेत. प्रत्येक प्रभागात बैठक सुरू केली आहे. वेगवेगळ्या पक्षातून आमच्याकडे काही नेते येण्यास इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी सोबत आहे. आगामी महापालिका निवडणुक पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. निवडून येण्याची क्षमता प्रभागात काम असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. असे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?