शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेनेचे जोरदार आठवा अजूबा आंदोलन...

शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेनेचे जोरदार आठवा अजूबा आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) - : शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज गुरुवारी रोजी जोरदार आठवा अजूबा आंदोलन करण्यात आले. महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तर शिवसेना संभाजीनगर पश्चिम शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे व उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे यांच्या संयोजकतेखाली हे आंदोलन पार पडले.
पालकमंत्र्याच्या दबावापोटी घाईघाईत केलेल्या या भुयारी मार्गाच्या उद्घाटनामुळे पाण्याची गळती लागली आहे. या गळतीमुळे भुयारी मार्ग खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून पावसाळ्यात नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.
पालकमंत्री हाय हाय...मनपा प्रशासन हाय हाय... उद्घाटन करून श्रेय घेणाऱ्या पालकमंत्र्याचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी शिवसैनिकांनी करून परिसर दणाणून सोडला...
महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आयुक्त आणि अभियंता यांनी कौतुकास्पद केलेल्या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे उपरोधिक शिवसेना महानगर प्रमुख राजू वैद्य हे यावेळी बोलले.
सदरील भुयारी मार्ग करण्यात आला त्याची रचना सुव्यवस्थित पद्धतीने करण्यात आली नाही. गुत्तेदाराने प्रत्यक्ष केलेल्या कामाकडे लक्ष दिले गेले नाही. यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा शिवाजीनगर भुयारी मार्ग जगातला आठवा अजूबा ठरावा असे बांधकाम झाले आहे. त्यांचे कौतुक करावे म्हणून हे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी श्रेय घेण्यासाठी घाईघाईने या भुयारी मार्गाचे उद्घाटन करायला लावले यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याची टीका वैद्य यांनी केली.
याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख हरीभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, उपहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, वसंत शर्मा, दिनेश राजेभोसले, नितीन पवार, संजय पवार, विभागप्रमुख नंदू लबडे, सचिन वाघुळे, संतोष बारसे, विनोद सोनवणे, विष्णु कापसे, संजोवन सरोदे, अशोक कीर्तिशाही, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, संध्या कोल्हे, संगीता नरोटे, बबिता रणयेवले, सविता निगोळे, मोहन म्हस्के, संतोष खंदारे, कल्याण चक्रनारायण, नानासाहेब रणयेवले, श्रीराम गाढे, बालाजी जाधव, पंडित चोपडे, पंकज पाठेकर, मनोज चव्हाण, रामदास शेमाडे, नीलकंठ खरात, आकाश मोरे, मंगेश बोरडे, कांतिलाल कोजे, रघुनाथ चिन्हे, शिवानंद महालिंगे, प्रकाश गोदने, शिवाजी बचाटे, सुनील कडवे, देविदास वाघ, जुनेश चव्हाण, संजीवन सरोदे, सागर निकम, सुखदेव जिगे, रामदास वाघमारे, देविदास पवार, नितीन चव्हाण, भाऊ सोनवणे, रावसाहेब राऊत, उत्तम इंगोले, गोरख सोनवणे, अनिल थोटे, प्रेम पेंढारकर, कैलास काथार, बाबासाहेब काळे, नितीन काकडे, निवृत्ती पळसकर, विकास गोरडे, सुमित शिलेदार, योगेश ताठे, विजय निकम, बालाजी पल्लिवाड, सत्यवान रगडे, आहेल्याजी कान्हे, हेमंत जाधव, विजय खंबायत, रितेश ठेंगे, विष्णु सोनवणे, शशिकांत चोंडेकर, अमृत पाटील, स्वप्नील सुपारे, अनिल पवार, गिरीश डांगे, नंदू मोरे व प्रतीक जाधव उपस्थित होते.
What's Your Reaction?






