मनपा शाळेचे विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीसापासून गणपती बणवणे कार्यशाळा संपन्न...
 
                                मनपा प्रा. शाळा गारखेडा येथे शाडू मातीपासून गणपती बनवणे कार्यशाळा संपन्न...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) -
प्रयास युथ फाऊंडेशनच्या वतीने आज मनपा. प्राथमिक शाळा, गारखेडा येथे “शाडू मातीपासून गणपती बनवणे कार्यशाळा” यशस्वीपणे संपन्न झाली. कार्यशाळेचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे व मनोहर महाडिक व केंद्रीय मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
आरती घडामोडे यांनी प्रात्यक्षिक करून गणपती मूर्ती बनवण्याचे शिक्षण दिले. तसेच रवी गावंडे , शारदा बस्ते , शार्दुल देशमुख, आरोही बस्ते, सुनिधी बस्ते यांनी विद्यार्थ्यांना मदत करून प्रत्यक्ष गणपती मूर्ती बनवून घेण्यास हातभार लावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशीला गवळे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनवण्याचे फायदे, पर्यावरणपूरकता आणि निसर्गरक्षणाचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, मूर्ती स्वतः बनवल्यामुळे त्यांनी सर्जनशीलता, संयम आणि पर्यावरणपूरकतेचा अनुभव घेतला.
कार्यशाळेचा समारोप सर्व उपस्थितांचे आभार मानत करण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा ठरला.
या कार्यशाळेच्या नियोजनासाठी शाळेतील अस्मिता अंभोरे, पुनम काटेकर, आफंदी मसीरा, श्रुतिका पालवे, आफ्रिन मिर्झा, सायली गायकवाड या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            