श्री योगेश्वर इंग्लिश स्कुल व ज्यु.काॅलेज वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

श्री योगेश्वर इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) नारेगाव - शेंद्रा एमआयडीसी रोडवरील महालपिंप्री येथील योगेश्वर इंग्लिश स्कूल व ज्यू कॉलेजचे 15 वे वार्षिक स्नेहसंमेलन एकापेक्षा एक सरस नृत्य , नाट्य , गायन , वादन सादरीकरणाने धुमधडाक्यात नुकतेच संपन्न झाले. उद्घघाटन टीव्ही वरील डान्स इंडीया डान्स रियालिटी शो चा अंतीम फेरीतील स्पर्धक विवेक जोगदंडे यांचे हस्ते करण्यात आले तर यावेळी अध्यक्षस्थानी
मा.सभापती सौ.अनुराधा ताई अतुल चव्हाण म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. योगेश अंभोरे - पाटील , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राधाकिसन पठाडे, चिकलठाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, मेसाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद शिंदे , प्रदेशाध्यक्ष रत्नाकर फाळके , डॉ. आदिनाथ वाळके, संतोष सोनवणे, सचिव श्रीधर अंभोरे पुनमसिंग पांडे, ज्ञानेश्वर ढाकणे, परभतराव अंभोरे, कैलास अग्रवाल, संजय तांगडे, पुंडलिकराव अंभोरे, बाळासाहेब अंभोरे, अल्ताफ शेख यांची उपस्थिती होती.
प्रारंभी शाळेच्या पर्यवेशिक सुनील साबळे यांनी प्रास्ताविक कले. दिपप्रज्वलनानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरवात झाली यावेळी नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस नृत्य , नाटय ' गायन , कीर्तन, एकापेक्षा सादरीकरणातून संपूर्ण शिवचरित्र , चंद्र्यान , मोबाईलचे दुष्यपरिणाम , अभ्यासाचे तणाव ' जातीय सलोखा आदी विषयाची थीम मांडणी तसेच कोळी , राजस्थानी, लावणी, भरत नाट्यम , कुचीपूडी , सोलो , जोडी आदी नृत्याने रसिक पालकांचे मने जिंकले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवत विद्यार्थ्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले. उद्घाटक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती अंभोरे व शाळेच्या उपमुख्याध्यापिका गुलनार शेख याने मार्गदर्शन करतांना कोणत्याही स्पर्धेत अपयश आले म्हणून खचून न जाता पून्हा पुन्हा प्रयत्न करावे शेवटी यश मिळती असतेच ,आणि अपयश हे यशासाठी दोनदा संधी असते असे बोलतांना सांगीतले. तसेच सर्व पाहुण्यांनी मार्गदर्शन करून उल्लेखनीय कार्याबद्दल संस्था व विद्यार्थ्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्याथ्यांनी तर आभार योगेश मोरे यांनी मानले कार्यक्रमासाठी प्रीती अंभोरे, गुलनार शेख, मनीषा वाघुले, विद्या राजगुरे, अश्विनी मगर, जुबेरराजा सय्यद, सिद्धीकी शिबा, निलेश उघडे, शमीन खान, ऋषिकेश दांडगे, केवलसिंग राठोड, मेहजबीन शेख, शाहिस्ता शेख, प्रदीप पारखे, भाग्यश्री पारखे आदींनी परिश्रम घेतले .
What's Your Reaction?






