महापालिकेचे एकूण 24 कर्मचारी सेवानिवृत्त
महानगरपालिकेचे वर्ग 1 ते 3 व 4 संवर्गातील एकूण 24 कर्मचारी सेवनिवृत्त
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज ) महानगरपालिकेचे वर्ग 1 ते 3 व 4 संवर्गातील एकूण 24 अधिकारी कर्मचारी नियत वयोमानाने आज सेवनिवृत्त झाले आहेत.
मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता ए.बी देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा, उप आयुक्त राहुल सूर्यवंशी, लखीचंद चव्हाण, यांची उपस्थिती होती.
सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना सेरोमोनियल कॅप, शॉल, पुष्पगुच्छ, सेवा प्रमाणपत्र व सामान्य भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यात आला. आयुक्त महोदयांनी सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना पुढील आनंदी ,स्वस्थ निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सेवा निवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यात अनुक्रमे वर्ग 1 ते 3 अंतर्गत उप अभियंता सुहास जोशी , वरिष्ठ लिपिक कांतीलाल थोरात, अखिल अहमद, सहशिक्षिका साजेदा बेगम, सय्यदा शाहिदा परवीन, सय्यदा मसीहा बेगम, वाहन चालक अब्दुल हमीद यांचे सह वर्ग 4 अंतर्गत 17 कर्मचारी यात 10 सफाई मजूर यांनी स्वच्छ निवृत्ती घेतली यात संजय बोर्डे, आशाबाई भुजंगे, सरस्वतीबाई उमप, सतीश पाईकडे, गिरधारी खरात, कचरू थोरात, बाळू लांडगे, शोभाबाई थोरात, सुनंदा उमप, विमलबाई चावरिया यांचा समावेश आहे. तसेच पुरुष मजूर 1 महेबूब खान,पाणीपुरवठा मजूर 2 अनंत गवई, शेख युसुफ, पशुधन मजूर 2 सत्यभागाबाई खरात, हाफिजा बी शेख फजल,व सफाई मजूर 1 राजेंद्र गायकवाड नियत वयोमानाने सेवा निवृत्त झाले आहेत.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंबीय यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले
.
What's Your Reaction?