गुंठेवारी नियमितीकरणासाठी 50 टक्के बेटरमेंट चार्जेस 31 मार्च 2025 पर्यंत भरता येणार
गुंठेवारी नियमितीकरणासाठी 50% बेटरमेंट चार्जेस 31 मार्च 2025 पर्यंत भरता येणार
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत वसाहतीमधील मिळकत धारकांसाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 (सुधारणा) 2021 नुसार गुंठेवारी नियमिती करणासाठी 200.00 चौ.मी. क्षेत्रा पर्यंतच्या निवासी वापराच्या मिळकती साठी फक्त विकास आकार (Betterment Charges) 50% सवलत देणे बाबत ठराव क्र. 1585/2024 दिनांक 13/9/2024 नुसार पारित करण्यात आलेला आहे.
ही सवलत दिनांक 31/12/2024३१ पर्यंत देण्यात आलेली होती. सदर सवलत दिनांक 31/12/2023 रोजी संपुष्टात येत आहे. या संदर्भात मिळकत धारकाचा वाढता प्रतिसाद पाहता, मिळकत धारकांना नियमीतीकरणाचे प्रस्ताव दाखल करणेसाठी प्रोस्ताहित करणेच्या उद्देशाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार 200.00 चौ. मी. पर्यंतच्या क्षेत्राच्या निवासी वापराच्या भुखंडासाठी विकास आकारामध्ये (Beterment Charges) देण्यात आलेली 50% सवलत ही दि. 31/03/2025 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
गुंठेवारी वसाहतीमधील मिळकत धारकांनी आपल्या भूखंडाचे / भूखंडा सहीत बांधकामाचे प्रस्ताव दिनांक 31/03/2025 पर्यंत महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभागात सादर करावेत. जे मिळकत धारक नियमीती करणासाठी आपले प्रस्ताव सादर करणार नाहीत, अशा मिळकत धारकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 260 अन्वये अनाधिकृत बांधकाम निष्काषीत करण्याची कार्यवाही करण्यात ये
ईल.
What's Your Reaction?