गुलमंडीत धक्कादायक निकाल, एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी...
गुलमंडीत धक्कादायक निकाल, एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.16(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहे. शिवसेनेच्या गडात एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी झाल्याने शहराच्या राजकारणाची आता दिशा बदललेली दिसते आहे. मतांच्या विभाजनाचा फटका शिवसेना, भाजपा व उबाठाला प्रभाग क्रमांक 15 मध्ये बसला आहे. येथे शिंदे सेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषीकेश जैस्वाल यांनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली तर उबाठाचे सचिन खैरे यांनी गड राखला आहे. एमआयएमच्या नूरजहाँ एकबाल व तरन्नूम अखिल अहेमद सागर यांनी बाजी मारली आहे. आता या चारही नगरसेवकांना प्रभागाच्या विकासासाठी काम करावे लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करताना हिरवा गुलाल उधळला.
.
What's Your Reaction?