चर्चेत असलेले रशीद खान मामू यांची अटीतटीच्या लढतीत बाजी...!
चर्चेत असलेले रशीद खान मामू यांची अखेर अटीतटीच्या लढतीत बाजी...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- उबाठाचा महापालिका निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. या निवडणुकीत उबाठाचे निकाल येईपर्यंत सहा नगरसेवक निवडून आले आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून रशीद खान मामू व मिळून तीन नगरसेवक निवडून आले आहेत. माजी महापौर रशीद खान मामू यांना उबाठाने पडेगाव प्रभाग क्रमांक 4 एसटी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर उमेदवारी दिली होती त्यानंतर भाजपा व शिंदे सेनेच्या नेत्यांनी टिकेची झोड उठवली होती. या निवडणुकीत रशीद मामू यांच्या मुळे राजकारण तापले होते. परंतु अटीतटीच्या लढतीत त्यांनी विजय मिळवला. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी दिल्याने नाराज होते त्यांनी मामूंच्या प्रचाराला जाणे टाळले होते. एमआयएमच्या खान अमीर अन्वर यांचा रशीद खान मामू यांनी पराभव केला होता.
What's Your Reaction?