नारेगाव येथे मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांचा चिमूकलीवर हल्ला, एमआयएम अक्रामक
नारेगवात मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांचा चिमूकलीवर हल्ला, एमआयएम अक्रामक...
उपचारासाठी घाटी रुग्णालयात त्रास झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर प्रशासनावर भडकले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) -
सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महीना सुरू आहे. पवित्र रमजान महिन्यात नारेगाव येथून वाईट बातमी आली आहे. मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांचा एका चिमूकलीवर जीवघेणा हल्ला झाल्याने एमआयएम मनपा प्रशासन व घाटी प्रशासनावर अक्रामक झाली आहे. यावेळी विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी घाटी रुग्णालयात दाखल झाले. याप्रसंगी नारेगावचे नगरसेवक मतीन पटेल व काकासाहेब काकडे यांनी रुग्णावर थातूरमातूर उपचार करून सुट्टी दिल्याने चिमुकलीला घेऊन घाटीत उपचारासाठी दाखल झाले. रमाजननिमित्ताने सहेरी करण्यासाठी उठलेल्या 4 वर्षिय आईशा मुस्तफा शेख, राहणार नारेगाव या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे नारेगाव परिसरात घडली असून घरासमोरील ओट्यावर उभी असतांना 4 ते 5 कुत्र्यांनी तिला ओढत नेत संपूर्ण शरीराचे लचके तोडले. यात गंभीर जखमी अवस्थेत नातेवाईकांनी चिमुकलीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारासाठी या वार्डातून त्या वार्डात फिरवले. औषधी सुध्दा उपलब्ध नाही. प्रथमोपचार करुन चिमुकलीला सकाळी सुट्टी दिली. मुलगी बेशुद्ध पडत आहे अनेक शरीरावर जखमा झाल्या तरीही घरी घेऊन जा असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. एमआयएमच्या नगरसेवकांशी संपर्क करुन उपचारासाठी घाटी रुग्णालयात पुन्हा आणले. डॉक्टरांनी योग्य उपचार करून द्यावे अशी माहिती जखमी मुलीच्या मामांनी दिली आहे. या घटनेनंतर नारेगाव परिसरात दहशत पसरली आहे. तसेच नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मागील वर्षभरात प्रचंडप्रमाणात वाढली आहे. प्रत्येक वसाहतींमध्ये किमान दोनशेहून अधिक कुत्रे टोळके फिरतांना दिसतात. यामुळे पादचारी पहाटे आणि रात्री घरातून बाहेर पडणे टाळतात. परंतु, त्यानंतरही महापालिकेकडून या मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येत नसल्याचेच चित्र दिसत आहे. मोकाट कुत्र्यांना बंदीस्त करुन ठेवावे, असे आदेश असतांना त्याकडे महापालिकेने दुर्लक्षच केले आहे. त्यात शनिवारी शहरात संताप जनक घटना घडली आहे. रमजानचा पवित्र महिना असल्याने मुस्लिम बांधव रोजा ठेवण्यासाठी पहाटेच सहेरी करण्यासाठी उठतात. नारेगावातही एक मुस्लिम कुटूंब पहाटे सहेरीसाठी उठले होते. त्यावेळी घरातील एक चिमुकली ओट्यावर येऊन उभी राहिली. तेवढ्यात 4 ते 5 कुत्र्यांच्या टोळक्यांनी या चिमुकलीला ओट्याहून फटफटत नेले. तसेच तिच्या संपूर्ण शरीरावर चावा घेत लचके तोडले. चिमूकलीच्या संपूर्ण शरीरावर कानावर अनेक जखमा झाल्या आहेत. चिमुकलीच्या ओरडण्याच्या आणि रडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून तिची सुटका केली. त्याच वेळी भयभीत झालेल्या गंभीर जखमी चिमुकलीला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी एमआयएमचे नगरसेवक काकासाहेब काकडे आणि मतीन पटेल हे देखील घटना स्थळी दाखल झाले होते. त्यानंतर विरोधी पक्ष नेता समीर बिल्डर यांनी महापालिकेच्या पशु संवर्धन विभागाचे डॉ. शाहेद शेख यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली.
विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी महापालिका प्रशासन व घाटी रुग्णालय प्रशासनावर टिका केली. घाटी रुग्णालयात औषधी व ओआरएस सुध्दा उपलब्ध नाही. औषधोपचार करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला. चिमुकलीवर योग्य उपचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. माहिती घेतली असता महापालिकेच्या वतीने मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी दिड कोटी खर्च केले. 15 हजार श्वनांवर शस्त्रक्रिया केली मग शहरात 70 हजार पर्यंत मोकाट कुत्र्यांची संख्या कशी वाढली. यावर लवकरच नियंत्रण करावे. शहरात मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांची संख्या वाढत आहे यावर महापालिका प्रशासनाने लवकर उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
What's Your Reaction?