नेहरुभवन येथील गाळ्यांचे गुत्तेदारांनी मार्केटिंग करावे- मनपा प्रशासक जी.श्रीकांत

 0
नेहरुभवन येथील गाळ्यांचे गुत्तेदारांनी मार्केटिंग करावे- मनपा प्रशासक जी.श्रीकांत

नेहरू भवन येथील गाळ्यांची गुत्तेदारांनी देखील मार्केटिंग करावी, प्रशासक

मनपा, 

औरंगाबाद, दि. 23( डि-24 न्यूज) नेहरु भवनच्या जागेवर नवीन शॉपिंग मॉल उभारले जात आहे. कंत्राटदाराने इमारतीचे बांधकाम सुरू केले असून दुसरीकडे महापालिकेने या शॉपिंग मॉलमधील गाळे लीजवर देण्यासाठी प्रस्ताव मागवले होते. मात्र विहित मुदतीत यास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

याशिवाय गाळे लीजवर घेण्यास प्रतिसाद मिळण्यासाठी संबंधित कंत्राटदारास देखील मार्केटींग करण्याची सूचना केली आहे.

  पालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी आज बुधवारी दि.23 ऑगस्ट रोजी सकाळी नेहरूभवनच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कंत्राटदाराला विविध सूचना देखील केल्या. नेहरु भवनाच्या पुर्नविकासासाठी 32 कोटी 1 लाख 93 हजार रुपयांचे अंदाज पत्रक तयार करण्यात आले आहे. हाय टेक इन्फ्रा कंपनीला हे काम दिले आहे. 4800 चौमी बांधकामाचे पूर्ण क्षेत्रफळ आहे. यात 20 दुकाने, 12 ऑफीस, ऑडीटोरीयम हॉल, प्रदर्शन गॅलरी आणि भव्य पार्कींगचे नियोजन आहे. 18 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे कंत्राटदारास आदेशित केले आहे. पालिका प्रशासकांनी पाहणी करताना कंत्राटदारास सूचित केले की, नेहरूभवनमधील गाळे लीजवर घेण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने देखील मार्केटींग करावी. त्यासाठी नेहरभवनमध्ये सेल्स ऑफिस व सेल्स टीम तयार ठेवावी. या टीमकडून मार्केटींग करण्यासाठी येथे येणार्‍यांना माहिती देण्यात यावी. बांधकाम साइटवर गाळ्यांच्या बांधकामाचा नकाशा गाळेनंबरसह लावावा. त्याचे क्‍लेमॉडेल देखील येथे लावावे. शॉप किपर असोसिएशन तयार करावी, अशा सूचना प्रशासकांनी केल्या. या पाहणीवेळी अतिरिक्‍त आयुक्‍त रणजित पाटील, शहर अभियंता ए.बी. देशमुख, कार्यकारी अभियंता आर.एन. संधांसह कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मनपा सभागृहाच्या कामाची गती वाढवा...

  नेहरूभवनच्या पाहणीपूर्वी प्रशासकांनी पालिका मुख्यालयातील सभागृह व आयुक्‍त दालन कामाचीही पाहणी केली. मागील दोन वर्षांपासून या मुख्य सभागृहाचे काम सुरू आहे. सोबतच पालिका आयुक्‍तांचे दालन आणि त्याला लागूनच एक मिटींग हॉल तयार केला जात आहे. मात्र पाहणीवेळी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रशासकांनी नाराजी व्यक्‍त केली. तसेच कंत्राटदारास कामाची गती वाढवण्याचे आदेशित केले. तसेच विकासकामात काही आवश्यक बदल देखील प्रशासकांनी सूचवले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow