अन त्याने केली जन्मदात्या आईकडेच केली शरीर सुखाची मागणी...!

 0
अन त्याने केली जन्मदात्या आईकडेच केली शरीर सुखाची मागणी...!

अन् त्याने केली जन्मदात्या आईकडेच शरीर सुखाची मागणी

मुलाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) जन्मदात्या आईकडेच एका 27 वर्षीय मुलाने शारिरीक संबंधाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे हद्दीतील ब्रिजवाडी भागात घडला असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 48 वर्षीय महिला आपल्या मुलासोबत ब्रिजवाडी भागात वास्तव्यास आहे. 6 ऑगस्ट रोजी रात्री तक्रारदार महिला व तिचा मुलगा बंटी (नाव बदलले आहे) हे दोघे घरी असतांना रात्री अकरा वाजेच्या सुमारास बंटी याने आपल्या जन्मदात्या आईकडे शरीर संबंध करण्याची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार महिलेने बंटीची समजूत काढली. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी पुन्हा रात्री अकरा वाजेच्या सुमारास बंटीने आईकडे शरीर संबंधाची मागणी करीत मला तुझ्यासोबत झोपू दे, तुझी पण हौस पूर्ण होईल असे म्हणत तिच्याशी अश्लिल चाळे करून विनयभंग केला. बंटीकडून होणार्‍या या अन्यायाला कंटाळलेल्या तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बंटीविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार तांबोरे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow