वीज जोडणीसाठी कनिष्ठ अभियंत्याने शेक-याकडे मागितली 5 हजारांची लाच, दोन अटक

 0
वीज जोडणीसाठी कनिष्ठ अभियंत्याने शेक-याकडे मागितली 5 हजारांची लाच, दोन अटक

वीज जोडणीसाठी कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनला 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले...

वैजापूर, दि.8(डि-24 न्यूज)- नवीन वीज जोडणीसाठी 5 हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरात करण्यात आली. 

आरोपींमध्ये नवनाथ दादा बेळे (वय 50, राहणार फुलेवाडी, तालुका वैजापूर), कनिष्ठ अभियंता, महावितरण उपकेंद्र खंडाळा आणि महेश शंकर पाडळे (वय 26), वायरमन, सबस्टेशन खंडाळा यांचा समावेश आहे. तक्रारदार शेतकरी असून नवीन वीज जोडणीसाठी त्यांनी ऑनलाइन अर्ज केला होता. 

तक्रारदाराच्या अर्जानुसार नवीन वीज जोडणी करून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता नवनाथ बेळे यांनी ₹5 हजारांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 8 सप्टेंबर 2026 रोजी वैजापूर तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी रोड परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपींकडून तक्रारदाराकडून ₹5 हजारांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस ठाणे शिरसाळा, जि. छत्रपती संभाजीनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले. 

सापळा अधिकारी : शरदचंद्र सुरेशराव राऊंडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना

पर्यवेक्षक अधिकारी : श्री. बी. एस. जाधवर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. जालना.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow