धार्मिक भावना दुखावणा-या समाजकंटकावर कडक कारवाईची विद्यार्थ्यांची मागणी...!

धार्मिक भावना दुखावणा-या समाजकंटकावर कडक कारवाईची विद्यार्थ्यांची मागणी...!
एमआयटी काॅलेजमध्ये घडली होती घटना...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) एमआयटी काॅलेजमध्ये निरोप समारंभात प्रोजेक्टरवर स्क्रीनवर एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावतील असा मजकुर लिहल्याची घटना उघडकीस आली होती. सातारा पोलिस ठाण्यात तेथील विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार दाखल केली होती परंतु त्या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई झाली नसल्याने विद्यार्थ्यांचा जमाव आज दुपारी पोलिस आयुक्त कार्यालयात जमा झाला होता. यावेळी त्या समाजकंटकावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी यासाठी कडक पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिस आयुक्तांना विद्यार्थ्यांनी केली. निवेदनावर मोहम्मद मुदस्सीर अन्सारी, अशराफ खान इस्माईल खान यांची सही आहे.
What's Your Reaction?






