जातीनिहाय जनगणना काँग्रेसच्या प्रयत्नामुळे, काँग्रेसने साजरा केला आनंदोत्सव

जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे काँग्रेसने जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा...
जातीनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे खरे श्रेय राहुल गांधींनाच.सामाजिक न्यायाच्या लढ्यात काँग्रेसचा निर्णायक विजय...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.2(डि-24 न्यूज)
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. हि काँग्रेसची मागणी होती म्हणून आज शहरात काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
भारतातील सामाजिक न्यायाची खरी पायाभरणी म्हणजे जातनिहाय जनगणना ही मागणी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांनी अनेक वर्षांपासून संसदेत, जाहीर व्यासपीठांवर आणि जनआंदोलनांतून सातत्याने मांडली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते: "ज्यांची संख्या जास्त, त्यांना हक्कही तितकेच!" ही भूमिका सामाजिक समतेच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित असून, ही मागणी वंचित, मागास, ओबीसी व सर्व शोषित घटकांसाठी न्याय मिळवून देणारी आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला हा विजय राहुल गांधींच्या दबावामुळेच शक्य झाला. आज या ऐतिहासिक यशाचा आनंदोत्सव आज शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पक्ष कार्यालय - गांधी भवन, शहागंज येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सह प्रभारी मा. कुणाल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष खा.डॉ.कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या सूचनेनुसार फटाके फोडून व पेढे वाटून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील, मा.आ.नामदेवराव पवार, इब्राहिम पठाण, मा.आ.एम.एम.शेख, डॉ. जितेंद्र देहाडे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोईन इनामदार, विनोद तांबे, भास्कर घायवट, सय्यद अक्रम, भाऊसाहेब जगताप, कैसर आझाद, शेख अथर, इंजि. विशाल बन्सवाल, अतिश पितळे, राहुल सावंत, वरून पाथ्रीकर, आमेर अब्दुल सलीम, कैसर बाबा, महेंद्र रमंडवाल, अरुण शिरसाठ, शफिक शहा, मोहित जाधव, संजय धर्मरक्षक, नंदकिशोर नजन, मुझझफर खान, संदीप बोरसे, शांतीलाल अग्रवाल, मोईन कुरेशी, दिक्षा पवार, अनिता भंडारी, उषा खंडाळे, शकुंतला साबळे, मुदस्सीर अन्सारी, योगेश थोरात, मुनीर पटेल, आबेद जहागीरदार, जकी मिर्झा यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






