किडनी विकून 11 कोटी रुपये नुकसानभरपाई देणार मराठा समाज...?

 0
किडनी विकून 11 कोटी रुपये नुकसानभरपाई देणार मराठा समाज...?

किडनी विकून 11 कोटी रुपये नुकसानभरपाई देणार मराठा समाज...?

307 ची गुन्हे मागे घेण्याची मागणी, आंतरवाली सराटी येथे दाखल झालेले गुन्हे आतापर्यंत मागे घेतली नाही..‌.

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) बीड येथे झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर झालेली नुकसानभरपाई गुन्हे दाखल झालेल्या आरोपींकडून 11 कोटी रुपये वसूल केले जातील, नसता त्यांची मालमत्ता विकून वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हि रक्कम मराठा सकल मराठा बांधव ती पूर्ण नुकसानभरपाई आपले 111 समाजसेवक स्वतःची किडनी विकून शासनाची नुकसानभरपाई करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रा.चंद्रकांत भराट यांनी दिली आहे.

याप्रसंगी सुरेश सा.वाकडे, अभिजित देशमुख, सुनील कोटकर, सचिन हावळे पाटील, सुकन्या भोसले, सखाराम काळे, रेखाताई वहाटुळे, दिव्या पाटील उपस्थित होते.

सरकारने बँक खाते क्रमांक द्यावे मराठा समाज नुकसानभरपाई देण्यास तयार आहे. ज्या युवकांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आत्महत्या केली त्यांना शासनाने जी आर्थिक मदत केली तीही परत देणार असल्याचा इशारा यावेळी मराठा समाजाने दिला आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळीच्या घटना मराठा समाजाने केली नाही तर आंदोलन भरकटले जावे यासाठी समाजकंटक घुसून हे कृत्य केले आहे. दोषी नसणारे युवकांची धरपकड केली जात आहे. काही मराठा समाजातील युवक ज्यांचा जाळपोळीच्या घटनेत संबंध नसताना युवकांना बेदम मारहाण करून नावे सांगण्यास बोलले जात आहे. हजारो युवक घर सोडून कोठेतरी राहत आहे ते दहशतीखाली वावरत आहेत. जे दोषी आहे त्यांना कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे.

अशी मराठा समाजाची मागणी आहे. आंतरवालीत जो अमाणूषपणे लाठीचार्ज व अश्रूधूर आंदोलकावर करुन महीलांना देखील जायबंदी केले व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. सरकारने हे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. गावा गावात जाऊन पोलिस धरपकड करत आहे ती थांबवावी. दिलेल्या वेळेत कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अन्यथा सरकारला मोठ्या आंदोलनास सामोरे जावे लागेल. सरकारने बँक खाते क्रमांक जाहीर करावे त्या बँक खात्यात नुकसानभरपाई समाज बांधव पैसे जमा करतील. युवकांनी आरक्षणासाठी आत्महत्या करु नये गावागावात जाऊन कुटुंबाचे समुपदेशन केले जात आहे. अशी माहिती यावेळी सुनील कोटकर यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow