अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवांची वक्फ बोर्डाला भेट

 0
अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवांची वक्फ बोर्डाला भेट

अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवांची वक्फ बोर्डाला भेट...

वक्फ मंडळाच्या कामकाजाची घेतली माहिती; पाणचक्की परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचीही पाहणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 7 (डि-24 न्यूज) : राज्य अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडवे-चावरे यांनी पाणचक्की येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यालयास भेट देऊन वक्फ बोर्डाच्या कामकाजाची माहिती घेतली.

यावेळी कक्ष अधिकारी प्रतिभा चौधरी, कक्ष अधिकारी जुनेद सय्यद तसेच अल्पसंख्याक आयुक्त प्रतिभा इंगळे उपस्थित होत्या. वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज खान आणि विशेष अधीक्षक खुसरो खान यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत करून मंडळाच्या विविध कामकाजाची माहिती दिली.

या भेटीदरम्यान अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडवे-चावरे यांनी वक्फ मंडळाच्या कार्यालयातील कामकाज, प्रशासनिक प्रक्रिया तसेच वक्फ मालमत्तांशी संबंधित विविध बाबींची माहिती जाणून घेतली.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाणचक्की परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली. ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व, त्यांचे संवर्धन तसेच संबंधित वक्फ मालमत्तांबाबतही यावेळी माहिती घेण्यात आली.

या भेटीमुळे अल्पसंख्याक विकास विभाग आणि वक्फ मंडळाच्या कामकाजासंदर्भात विविध बाबींवर प्रत्यक्ष पाहणी व माहितीची देवाणघेवाण झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow