एसडिपिआयचा इम्तियाज जलील यांना पाठिंबा, सय्यद कलिम यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
एसडिपिआयचा इम्तियाज जलील यांना पाठिंबा, सय्यद कलिम यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) आज औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून एकूण 40 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. यामध्ये मतांचे विभाजन होऊ नये व मुस्लिम नेतृत्वाची आज शहराला गरज आहे म्हणून एमआयएमचे अधिकृत उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांना पाठिंबा जाहीर करत प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पुणे जिल्ह्यातील हडपसर या मतदारसंघातून एसडिपिआयचे अधिकृत उमेदवार अजहर तांबोळी या निवडणुकीत उभे आहेत त्या मतदार संघात एमआयएमने पाठिंबा दिला असल्याचे सय्यद कलिम यांनी सांगितले. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून एसडिपिआयचा उमेदवार मैदानात कायम आहे त्यांनी आपला आर्ज मागे घेतला नाही. त्या मतदारसंघात एमआयएमला किंवा अपक्षाला पाठिंबा देणार किंवा निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे.
याप्रसंगी एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, एड खिजर पटेल, एसडिपिआयचे युसुफ पटेल, जब्बार खान, मोहसीन खान व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?