राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी, इच्छुक उमेदवारांकडून मागवले अर्ज
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी
इच्छुक उमेदवाराकडून मागितले अर्ज
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.25(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुरजितसिंग खुंगर D-24 न्यूजला दिली आहे.
त्यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य प्रदेश विभागाला इच्छूकांचे अर्ज पाठवण्यासाठी आदेश आलेले आहे. पक्षाच्या वतीने कळवण्यात आले आहे की महाविकास आघाडी सोबत हि निवडणूक राष्ट्रवादी लढणार आहे. महाविकास आघाडीत किती जागा मिळतील अजून निर्णय झाला नाही तरीही इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.
पक्षाच्या नेत्यांनी सक्षम, शिक्षित व पक्ष संघटनेसोबत समाजकार्यात अग्रेसर असलेले उमेदवार देण्याची तयारी पक्षाची आहे. सामान्य इच्छुक उमेदवारांना अर्जासोबत दहा हजार रुपये, अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक उमेदवाराने पाच हजार रुपये पक्षनिधी जमा करायचे आहे. ज्या पक्षाला आघाडीत जागा सुटेल इच्छुक उमेदवाराला तेथून आपला उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. पक्षाने जो उमेदवार निश्चित केला त्याचे विरोधात अर्ज भरायचे नाही असे शपथपत्रात अगोदरच लिहून द्यावे लागेल. लवकरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून इच्छूकांचे अर्ज स्विकारण्याची कारवाई करण्यात येणार आहे असे खुंगर यांनी सांगितले.
What's Your Reaction?