राज्यात बदल घडवायचा असेल तर एकजूट दाखवा, लढायला तयार राहा - आदीत्य ठाकरे

 0
राज्यात बदल घडवायचा असेल तर एकजूट दाखवा, लढायला तयार राहा - आदीत्य ठाकरे

लढायला तयार राहा-

 युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा 

उशिरा आगमन झाल्याने सिल्लोडचा दौरा केला स्थगित...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद)दि.25(डि-24 न्यूज) महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे केंद्रात भाजपचे कसेबसे सरकार आले आहे. राज्यातही आपल्याला बदल घडवायचा असेल तर एकजूट दाखवावी लागेल. परिश्रम घ्यावी लागतील. निवडणुका आल्यावर मिंधे सरकार तुम्हाला विकत घेण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना न जुमानता आपली एकजूट दाखवा, आता महाराष्ट्र फसणार नाही, हे दाखवून द्या, असे आवाहन युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. 

संत एकनाथ रंगमंदिरात औरंगाबाद-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेते ठाकरे बोलत होते.

यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, चेतन कांबळे, महिला आघाडीच्या सुनिता आऊलवार, सुनिता देव, आशा दातार, विद्या अग्निहोत्री, युवा सेनेचे ऋषीकेश खैरे, धर्मराज दानवे, हनुमंत शिंदे, सचिन खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार आदीत्य ठाकरे म्हणाले की, जी प्रगती या पन्नास खोकेवाल्यांची झाली, ती महाराष्ट्राची झाली आहे का...?, याचा विचार करा. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, ते या मिंधे सरकारने गुजरातला पळवून दिले. महापालिनगरका, नगरपालिका, जिल्हा परिषदाच नव्हे तर मुुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका घेण्यासही हे सरकार घाबरत आहे. जनतेसमोर जायला घाबरणारे हे सरकार कंत्राटदारासमोर नतमस्तक होत असल्याची टिका केली. इकडे परभणीत नोकऱ्या मिळत नाही, आणि हे सरकार जर्मनीत एक लाख नोकऱ्या देणार असल्याचे सांगत आहे. गोवा, गुवाहटीला हे जसे गेले होते, तसे यांना जर्मनीला जाण्यासारखे वाटत आहे असा चिमटाही काढला. सरकारच्या काळात बदल्यांसाठी पाकिटे, खोके कल्चर सुरू झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दहा वर्षांपूर्वी जे 15 लाख रुपये देऊ, असे म्हणत होते, ते आता 1500 रुपये देत आहे. काही दिवसांनी यातील 2 शून्यही उडून जाईल. 15 रुपयेच मिळतील. या सरकारने शेतकऱ्यांना 15 रुपयांचे धनादेश दिलेले आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली. महिलांना बळ देणाऱ्या शक्ती कायद्यासाठी आम्ही राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करत असल्याचे ते म्हणाले. 

या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 6 वाजता होती. मात्र आदित ठाकरे यांना येण्यास तब्बल सव्वा तीन तास उशीर झाला. त्यामुळे नेत्यांच्या भाषणाला काट देण्यात आल्याने अनेकांना ठाकरेंसमोर आपल्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत. माजी खासदार खैरेंना सुध्दा भाषण करता आले नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow