महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रम, 5 नवं उद्योजकांचे जिल्हास्तरीय सादरीकरण
 
                                ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ उपक्रम
5 नवउद्योजकांचे जिल्हास्तरीय सादरीकरण
औरंगाबाद,दि.15(डि-24 न्यूज)- महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत नवउद्योजकांच्या जिल्हास्तरीय सादरीकरणाचा टप्पा आज पार पडला. आजच्या सादरीकरणात 5 नवउद्योजकांनी आपले सादरीकरण केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयामार्फत छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजिनीअरींग येथे हे सादरीकरण झाले. उद्घाटन प्रसंगी मॅजिक संस्थेचे संचालक आशिष गर्दे, छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजिनीअरींग चे प्राचार्य डॉ.उल्हास शिंदे, सहायक आयुक्त सुरेश वराडे उपस्थित होते.
आशिष गर्दे म्हणाले की, अशा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव मिळत असल्याने प्रत्येक महाविद्यालयांनी व इन्क्युबेशन केंद्रांनी आपल्या भागातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्राचार्य डॉ. शिंदे म्हणाले की, मुलांमध्ये नवकल्पना व क्रिएटीव्हीटी साठी अशा प्रकारल्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता असल्याचे व अशा उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी तज्ञ प्रशिक्षक व मार्गदर्शक उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविक करताना सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले. पाच तज्ज्ञांच्या ज्युरी पॅनेलसमोर 5 नव उद्योजकांनी आपले सादरीकरण केले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            