नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन...!

 0
नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन...!

नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन...! 

मराठवाड्यात शोककळा....

 नांदेड, दि. 26(डि-24 न्यूज ) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे हैदराबाद येथील रुग्णालयात निधन झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री चव्हाण यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

ते 64 वर्षांचा होते.

मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांना गेल्या आठवडाभरापासून श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .त्यांची तब्येत अधिक खालावल्याने त्यांना तातडीने हैदराबाद येथील किंग्ज रुग्णालयात काल रात्री हलविण्यात आले होते , तेथे त्यांचे निधन झाले .

 2009 मध्ये ते नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेचे अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले. 

 मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती झाली.

सप्टेंबर 2014 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून 13 व्या महाराष्ट्र विधानसभेसाठी पुन्हा निवडून आले होते.

काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण असूनही, वसंत चव्हाण यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नांदेड लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन भाजपचे विद्यमान उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांचा पराभव करून निवडून आले.

चव्हाण यांच्या पार्थिवावर नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली.

D24NEWS English News 

Nanded,Aug 26(D24NEWS) Senior Congressman and party Member of Parliament of Nanded Vasant Chavan passed away early this morning at hospital in Hyderabad.

According to the sources stated ,Chavan health was detoirted on last night and he was admitted to the hospital in Hyderabad.

However,during the treatment he was breathed last week hours on today .

 He was 64.

 As per the information Chavan complaining respiratory problem since last week and was admitted in the hospital here .After his health further detoirted he was urgently shifted to Kings hospital in Hyderabad on last night where he was succumbed early hours.

He was elected as an independent member of the Maharashtra Legislative Assembly representing Naigaon Assembly constituency in 2009. 

In May 2014, he was appointed to the Legislative Assembly's Public Accounts Committee.

 He joined the Indian National Congress party in September 2014 and was re-elected to the 13th Maharashtra Assembly as a Congress party member.

Despite former congress chief minister Ashok Chavan who was joined BJP after resigning from Congress , Vasant Chavan contested Nanded lok sabha election as Congress nominee and was elected by defeating then BJP sitting candidate Pratap Patil-Chikhlikar.

Vasant Chavan funeral ceremony will be held on tomorrow at Naigaon in Nanded district ,said family sources.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow